आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Irfan Ahmed: Hong Kong All rounder Banned For Two And A Half Years

क्रिकेटपटू इरफानवर अडीच वर्षांची बंदी, भ्रष्टाचारविरोधी आचारसंहिता मोडल्याप्रकरणी शिक्षा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुबई - हाँगकाँगचा अष्टपैलू क्रिकेटपटू इरफान अहमदवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) भ्रष्टाचारविरोधी आचारसंहिता मोडल्याप्रकरणी दोषी आढळल्यानंतर अडीच वर्षांची बंदीची शिक्षा जाहीर केली अाहे. आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी संस्थेकडून (एसीयू) दोषी आढळल्यानंतर इरफानला मागच्या नोव्हेेेंबरमध्ये तत्काळ निलंबित करण्यात आले होते. तपासणीच्या वेळी इरफान अहमदने सट्टेबाजांसंबंधीची माहिती लपवल्याचा त्याच्यावर आरोप आहे. इरफान अहमदला दिलेली शिक्षा सर्व खेळाडूंसाठी एक धडा आहे, असे एसीयूचे अधिकारी फ्लेनेगनने म्हटले.