आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अनुष्का-विराटचे डिसेंबरमध्ये शुभमंगल सावधान! अशी सुरु आहे लग्नाची जय्यत तयारी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - डिसेंबर महिन्यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड स्टार अनुष्का शर्मा लग्नाच्या बंधनात अडकला असल्याची इंडस्ट्रीमध्ये चर्चा आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार विराट कोहलीच्या दिल्ली, तर अनुष्काच्या मुंबईच्या घरी लग्नाची जय्यत तयारी सुरु आहे. दोघांच्या घरी सध्या लगीनघाई सुरु आहे.

 

फॅशन डिझायनरला भेटली अनुष्का....

 

- काही दिवसांपूर्वी फॅशन डिझायनर सब्यसाची आपल्या टीमसह अनुष्काच्या घरी गेला होता. त्याठिकाणी ही फॅशन डिझायनरची टीम बराच काळा थांबली हेाती. अनुष्का तिच्या लग्नाचे ड्रेस डिझाईन करण्याची शक्यता वर्तविली जातेय.
- काही दिवसांपूर्वी विराटने डिसेंबरमध्ये ब्रेक मागितल्याची चर्चा होती. तिकडे अनुष्कानेही शाहरुखसोबत येणाऱ्या आगामी चित्रपटाची शूटिंग लवकर संपविण्यास सांगितले आहे. त्यामुळे शाहरुख आणि अनुष्का शूटिंगसाठी जास्तीचा वेळ देताहेत.
- लग्नानंतर दोघेही वरळीला शिफ्ट होणार असल्याची चर्चा आहे. त्याठिकाणीद दोघांनी तब्बल 34 कोटी रुपयांचा एक फ्लॅट खरेदी केला आहे.

 

मागील वर्षी आल्या होत्या लग्नाच्या बातम्या
- मागील वर्षी डिसेंबर महिन्यात दोघांच्या साखरपुड्याच्या बातम्या ऐकायला आल्या होत्या. यादरम्यान विराटने ट्विट करून सांगितले होते की, माझी एंगेजमेंट झाली नाही.
- आता लग्नाची चर्चा खरी की खोटी? हे विराट किंवा अनुष्कालाच स्पष्ट करावे लागेल.

 

पुढील स्लाईडवर पाहा - विराट आणि अनुष्कासोबत काही फोटोज्

बातम्या आणखी आहेत...