आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ईशांत शर्मा चिकुनगुन्याने आजारी; न्यूझीलंडचा जेम्स निशाम जखमी!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कानपूर - भारताचा वेगवान गाेलंदाज ईशांत शर्मा चिकुनगुन्याने आजारी पडला आहे. यामुळे ताे गुरुवारपासून न्यूझीलंडविरुद्धच्या सुरू होणाऱ्या पहिल्या कसाेटीला मुकणार अाहे. २२ सप्टेंबरपासून भारत अाणि न्यूझीलंड यांच्यातील तीन कसाेटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात हाेत अाहे. यातील पहिली कसाेटी कानपूरच्या ग्रीन पार्कवर हाेईल. सध्या दिल्लीमध्ये चिकुनगुन्या अाजाराने प्रचंड थैमान घातले अाहे. त्याचाच फटका अाता टीम इंडियाला ईशांत शर्माच्या रूपाने बसला.

‘ईशांत शर्मा हा चिकुनगुन्याच्या अाजारातून सावरत अाहेे. त्यासाठी त्याला विश्रांतीची गरज अाहे. यामुळे ताे अाता न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसाेटीत खेळू शकणार नाही. अद्याप त्याच्या जागी पर्यायी खेळाडूची घाेषणा केली नाही. मात्र, लवकरच यासाठी खेळाडूूची निवड केली जाईल,’अशी माहिती मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी दिली. इशांत संघाबाहेर झाल्याने भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी या वेगवान गोलंदाजांना प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते.

जखमी जिमी निशाम सलामी कसाेटीतून बाहेर
सरावादरम्यान गंभीर दुखापत झाल्याने न्यूझीलंडचा अष्टपैलू निशाम अाता पहिल्या कसाेटीत खेळणार नाही. विश्रांतीमुळे ताे या कसाेटीला मुकणार असल्याची माहिती न्यूझीलंड संघाने दिली. या दुखापतीमुळे त्याने मुबंईविरुद्ध सराव सामन्यात केवळ पाच षटके गोलंदाजी केली. निशामला अाता दुसऱ्या कसाेटीत सहभागी हाेण्याची अाशा अाहे.

विजय-राहुलने खेळावे : लक्ष्मण
भारताकडून सलामीला मुरली विजय आणि के.एल. राहुल यांना संधी दिली पाहिजे, असे मत माजी खेळाडू व्ही.व्ही.एस. लक्ष्मणने व्यक्त केले आहे. विजय भरवशाचा सलामीवीर असून, राहुल फॉर्मात आहे. मी या दोघांना पाठींबा देतो, असे तो म्हणाला.

भारतीय संघ अधिक मजबूत : ब्रेट ली
नवी दिल्ली | आगामी भारत आणि न्यूझीलंडदरम्यान होणाऱ्या मालिकेत टीम इंडिया अधिक मजबूत आहे, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट लीने व्यक्त केले. भारतीय संघ मजबूत फलंदाजीच्या आधारे तसेच आकड्याच्या आधारेसुद्धा किवी संघाच्या तुलनेत मजबूत आहे, असे लीने म्हटले. ब्रेट ली येथे दोन्ही देशांत मालिकेपूर्वी होणाऱ्या चर्चेत सहभागी होण्यासाठी आला. या चर्चेत माजी कर्णधार कपिलदेव आणि माजी फलंदाज व्ही. व्ही. एस. लक्ष्मण हेसुद्धा हजर होते.

खेळपट्टी फिरकीला मदतगार : हेसन
कानपूर | भारताविरुद्ध येत्या २२ सप्टेंबरपासून ग्रीन पार्कच्या स्टेडियमवर सुरू होणारा पहिला कसोटी सामना आव्हानात्मक असल्याचे न्यूझीलंड क्रिकेट संघाचे कोच माइक हेसन यांनी सांगितले. या सामन्यात फिरकीपटूंची भूमिका महत्त्वाची असेल, असे त्यांनी सांगितले.
न्यूझीलंड संघाने मंगळवारी सकाळी ग्रीन पार्क स्टेडियमच्या नेटवर कसून सराव केला. सरावानंतर पत्रकारांशी बोलताना हेसन म्हणाले, “येथे खूप उकाडा आणि दमट वातावरण आहे. येथील वातावरण पूर्णपणे वेगळे आहे. येथील वातावरणाशी एकरूप होण्यास आमची टीम प्रयत्न करत आहे. दिल्लीत सराव सामना खेळून आमचा संघ खूप उत्साहित आहे. मात्र, येथील खेळपट्टी वेगळी असून त्यानुसार आम्ही सराव करत आहोत. खेळपट्टीवर थोडे गवत असून येत्या दोन दिवसांत ते दूर होण्याची शक्यता आहे.’

खेळपट्टी बघून येथे फिरकीपटूंना मदत मिळेल, असे वाटते. आम्ही भारतीय संघाच्या फिरकीपटूंचे व्हिडिओ बघून रणनीती तयार करत आहोत. भारताचे स्पिन आक्रमण मजबूत असून त्यांचे फलंदाज फिरकीला चांगले खेळतात. न्यूझीलंडकडेसुद्धा चांगले फिरकीपटू आहेत. आमच्याकडे चांगली संधी आहे, असे आम्हाला वाटते. सामना चांगला होईल. आम्ही नव्या चेंडूने फिरकीपटूंना खेळण्याचाही सराव करतो आहे. येथील खेळपट्टी बघून नव्या चेंडूने फिरकीपटूंकडून गोलंदाजी होऊ शकते, असे दिसते, असे हेसन म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...