आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बांगलादेश दौऱ्यासाठी बटलरकडे नेतृत्व शक्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- इंग्लंडचा मर्यादित षटकांचा कर्णधार इयान मोर्गनने ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या बांगलादेश दौऱ्यातून माघार घेतली आहे. त्याच्या अनुपस्थितीत विकेटकीपर जोस बटलरकडे इंग्लंड संघाचे नेतृत्व या छोट्या दौऱ्यासाठी येऊ शकते. जोसने मागच्या वर्षी पाकिस्तानविरुद्ध टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात नेतृत्व केले होते. याशिवाय देशांतर्गत क्रिकेटमध्येही त्याच्याकडे नेतृत्व करण्याचा अनुभव आहे. इंग्लंडची टीम बांगलादेश दौऱ्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळेल.

पुढच्या दौऱ्यातून माघार घेतल्यामुळे मोर्गनने नव्या वादाला जन्म घातला आहे. त्याच्यावर सर्वत्र टीका होत आहे. त्याच्याशिवाय अॅलेक्स हेल्सनेसुद्धा बांगलादेश दौऱ्यावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. ईसीबीच्या चेअरमनने मोर्गनला आपल्या निर्णयावर फेरविचार करण्यास सांगितले आहे.
बातम्या आणखी आहेत...