आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रो कबड्डीचा दुसरा हंगाम १८ जुलैपासून रंगणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - प्रो कबड्डी लीग’च्या दुसऱ्या हंगामाची सुरुवात येत्या १८ जुलैपासून मुंबईत गतविजेत्या जयपूर पिंक पँथर्स आणि यजमान यू मुम्बा यांच्यातील लढतीने होणार आहे. मशाल स्पोर्ट््स आणि स्टार स्पोर्ट््स यांच्या वतीने आयोजित होणाऱ्या या कबड्डी लीगचे सामने जगभरात थेट प्रक्षेपित केले जाणार असून ६०० कोटी प्रेक्षक हे सामने पाहतील, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. गत हंगामात एकूण ४३५ कोटी प्रेक्षकांनी ही लीग पाहिली होती. १८ जुलै ते २३ ऑगस्ट या कालावधीत ही लीग होईल.
यंदा १४ ऐवजी २५ खेळाडूंची मुभा प्रत्येक संघाला देण्यात आली आहे. भारतासह एकूण १३ देशांच्या खेळाडूंचा समावेश असलेल्या ८ फ्रँचायझींचे संघ एकूण ८ शहरांमध्ये आपल्या कबड्डी कौशल्याचे प्रदर्शन करतील. इंग्रजी, हिंदी भाषांप्रमाणे या वेळी स्टार नेटवर्क्सच्या माध्यमातून मराठी, कन्नड व तेलुगू भाषेतून समालोचन करण्यात येणार आहे.

या वेळी १०० देशांमध्ये प्रो कबड्डी लीग सामने दाखवण्यात येणार असून अमेरिका, इंग्लंड, मध्यपूर्वेकडील देश तसेच दक्षिण अमेरिकेतील काही देशांमध्येही प्रो कबड्डी लीगचे सामने प्रक्षेपित होणार आहेत. कबड्डी या भारतीय खेळाची जगाला ओळख व्हावी या हेतूने मशाल स्पोर्ट््सने हा खेळ निवडला. अधिक चांगल्या पद्धतीने जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केला, असे मशाल स्पोर्ट््सचे संचालक चारू शर्मा यांनी सांगितले.

{मुंबई, कोलकाता, जयपूर, पाटणा, हैदराबाद, पुणे, बंगळुरू आणि दिल्ली हे
आठ संघ या स्पर्धेत भाग घेणार आहेत.
{मुंबई येथे १८ जुलै, १९ जुलै, २० जुलै, २१ जुलै तसेच २१ ऑगस्ट रोजी उपांत्य फेरी आणि २३ ऑगस्ट रोजी
अंतिम फेरीचे सामने होतील.
स्पर्धेची खास वैशिष्ट्ये
{या वेळेस प्रथमच पाच भाषांमध्ये धावते समालोचन करण्यात येणार आहे. हिंदी, इंग्रजीसोबतच मराठी, तेलुगू आणि कन्नड भाषांमधून कबड्डीचे धावते समालोचन करण्यात येणार आहे.
{१८ जुलै रोजी सुरू होणाऱ्या प्रो कबड्डीच्या उद््घाटनच्या सोहळ्यात प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन राष्ट्रगीत गाणार आहेत.
{ स्पर्धेत या वेळेस प्रथमच आठ वाहिन्यांवरून प्रो कबड्डीच्या सामन्यांचे थेट प्रक्षेपण करण्यात येईल.
{सामाजिक बांधिलकीचा भाग म्हणून ‘स्वच्छ भारत अभियान’ भारतातील जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे ठरविले आहे.
बातम्या आणखी आहेत...