आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वेत क्लास-4 कर्मचारी होता हा स्टार क्रिकेटर, आज आहे कोट्यधीश...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिशा पटानी आणि निता अंबानींसोबत... - Divya Marathi
दिशा पटानी आणि निता अंबानींसोबत...
स्पोर्ट्स डेस्क - दलीप ट्रॉफीत एकाच मॅचमध्ये 10 विकेट्स घेऊन कर्ण शर्मा जगभरात चर्चेत आला. त्याने पहिल्या इनिंगमध्ये 39 रन देऊन त्याने 4 विकेट्स पटकावल्या. तर, दुसऱ्या इनिंगमध्ये 94 रन देऊन त्याने 6 बळी घेतले. स्टार क्रिकेटर बनलेला कर्ण शर्मा एकेकाळी रेलवेत चतुर्थ श्रेणी कर्मचारी होता. तो रेल्वे रुळांच्या दुरुस्ती आणि देखरेखचे काम करत होता. 
 
 
आयपीएलमध्ये चमकले करिअर
- कर्ण 2005 मध्ये रेल्वे विभागात रुजू झाला होता. त्यावेळी तो एक चतुर्थ श्रेणी कर्मचारी होता. लोखंडी रॉड उचलण्यापासून ते रुळांची दुरुस्ती करण्यापर्यंत सर्वच अंग मेहनतीचे काम त्याने केले आहेत. वेळोवेळी क्रिकेट खेळण्यासाठी त्याला या कामांपासून सुटका मिळाली होती. तो वाराणसी येथे कार्यरत होता.
- आयपीएलच्या 7 व्या सीजनमध्ये तो एका दिवसात करोडपती झाला होता. सनरायजर्स हैदराबादने त्याला 3.75 कोटी रुपये देऊन टीममध्ये सामिल केले होते. 
 

बायकोला विश्वास बसत नव्हता...
कर्णला कोट्यधीश झालेला क्षण आजही आठवतो. पहिल्यांदा तर त्याला यावर विश्वासच बसला नाही. त्याने आपल्या बायकोला फोन करून 3.75 मिळत असल्याची गोड बातमी दिली. विशेष म्हणजे, पत्नीला सुद्धा ऐकूण विश्वास बसत नव्हता. कर्ण मस्करी करत असेल असे तिला वाटले होते. तिने कर्णच्या मित्रांना फोन करून खरे काय ते जाणून घेतले होते. 
 

असा होता ऐतिहासिक सामना
स्टार बॅट्समन करुण नायर (120) ची सेंचुरी सुद्धा इंडिया ग्रीनला वाचवू शकली नाही. विरोधक टीम इंडिया रेडने 170 धावांनी मोठा विजय नोंदवला. इंडिया रेडने पहिल्या इनिंगमध्ये 323 धावा काढल्या होत्या. प्रत्युत्तर देण्यासाठी उतरलेली टीम इंडिया ग्रीन 157 धावांवर गुंडाळली गेली. पहिल्या इनिंगमध्ये इंडिया रेडला 166 धावांची लीड मिळाली होती. इंडिया रेडने दुसऱ्या इनिंगमध्ये दो विकेट गमवून 307 धावा केल्याचे जाहीर केले. आणि इंडिया ग्रीनसमोर 474 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले. यात टीम इंडिया ग्रीन 303 धावांवर सर्वबाद झाली. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी फोटोज आणि तथ्य...
बातम्या आणखी आहेत...