काेची - सहाव्या सत्राच्या अायपीएलमधील स्पाॅट फिक्सिंग प्रकरणातून श्रीसंतची नुकतीच निर्दाेष मुक्तता करण्यात अाली. त्यामुळे अाता भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेही श्रीसंतवर लावलेली बंदी हटवण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी केरळ क्रिकेट असाेसिएशनच्या वतीने करण्यात येणार अाहे. यासाठी बीसीसीअायला साकडे घालण्यासाठी केसीएने मैदानात उतरण्याची तयारी दर्शवली अाहे. यासाठी केसीएच्या वतीने लवकरच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष अाणि उपाध्यक्ष यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात येणार असल्याचेही केसीएने स्पष्ट केले.
न्यायालयाने फिक्सिंग प्रकरणातून श्रीसंतसह चंदिला अाणि चव्हाणची निर्दाेष मुक्तता केली. मात्र, त्यानंतर या तिन्ही खेळाडूंवर करण्यात अालेली बंदीची कारवाई कायम राहणार असल्याची माहिती बीसीसीअायने दिली. त्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अापल्या निर्णयावर पुनर्विचार करावा अाणि निर्दाेष सुटलेल्या श्रीसंतला खेळण्याची संधी द्यावी, अशी प्रतिक्रिया केरळ क्रिकेट असाेसिएशनच्या वतीने देण्यात अाली. मात्र, याबाबत बीसीसीअायचा निर्णय महत्त्वाचा ठरेल.