आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंग्लंडचा क्रिस ग्रॅहम होता अल्झायमरने पीडित, या आजारावर संशोधन करण्यासाठी दिले पैसे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बर्कशायर- इंग्लंडचा क्रिस ग्रॅहम अल्झायमरशी पीडित होता. त्याने आपले वडील, आजोबा, आत्या आणि भावाला या आजारामुळेच गमावले. या आजारपणावर संशोधन करण्यासाठी पैसे गोळा करण्याचे त्याने ठरवले. कॅनडातून सायकलिंग सुरू केली. २३८ दिवसांत जवळपास २५ हजार किमी सायकलिंग केली. ३५ लाख रुपये गोळा केले आणि लंडनच्या न्यूरॉलॉजी इन्स्टिट्यूटला दिले.

याबाबत तो म्हणतो, ‘मी आर्मीत रॉयल इंजिनियर आणि नंतर पोस्टल आणि करिअर सर्व्हिसमध्ये कमांडो होतो. माझ्या कुटुंबात चार जाण अल्झायमरमुळे पीडित होते. माझ्या वडिलांचे निधन अवघ्या ४२ व्या वर्षी झाले. आजोबा, आत्या आणि भावाचाही मृत्यू ४५ व्या वर्षी झाला. मी माझ्या कुटुंबाबाबत विचार करतो तेव्हा वाटते की जगात अनेक लोकांसोबत असे घडत असावे. ते आपल्या कुटुंबाला कसे सांभाळत असतील? अल्झायमरच्या सुरुवातीच्या स्टेजवर योग्य उपचार सुरू झाले तर हे अाजारपण बऱ्यापैकी आटोक्यात येऊ शकते. यामुळे मी पैसे गोळा करण्याचा निर्णय घेतला. पत्नी विकीला याबाबत सांगितले तेव्हा तिने मला पाठिंबा दिला. मी टोरंटोतून सायकलिंग सुरू करण्याचा निर्णय घेतला. मी रोज सकाळी वाजता जागून सायकलिंग सुरू करत असे. एका दिवसात जवळपास ६० किमी सायकलिंग करत असते. मी माझ्यासोबत टेंट, स्लीपिंग बॅक, स्वयंपाकाचे साहित्य, औषधी ठेवले होते. सोबतच एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइससुद्धा होते. माझी पत्नी सॅटेलाइट ट्रॅकरच्या मदतीने माझी मदत करीत असे. ती मला वातावरण, रस्ते आदींबाबत माहिती देत असे. यादरम्यान मी बोस्निया, कोसोवो, नॉर्वे, कॅनडा आदी देशांची यात्रा केली. अनेक देशांतील तापमान ५० डिग्री इतके होते, तर काही ठिकाणी मायनस १० डिग्री होते. अशा वेळी कुटुंबाचा विचार यायचा. यामुळे मला आणखी बळ मिळत असे. अनेक ठिकाणी रस्त्यांत जंगली प्राण्यांचाही सामना करावा लागला,असेही त्याने सांगितले.
बातम्या आणखी आहेत...