आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोहली, रोहित सर्वात जवळचे मित्र : रहाणे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दोघे माझे सर्वात जवळचे मित्र आहेत, असा खुलासा भारताचा फलंदाज अजिंक्य रहाणेने केला आहे. बीसीसीआयने माझी संघात निवड केली आहे, यासाठी फोन केला तेव्हा मी स्तब्ध झालो होतो, असेही त्याने म्हटले. मागच्या काही वर्षांत रहाणेने स्वत:ला टीम इंडियाचा एक उत्तम क्रिकेटपटू विकसित केले आहे. आता तो तिन्हा स्वरूपाच्या क्रिकेटमध्ये प्रमुख फलंदाज बनला आहे. नुकतेच अजिंक्य रहाणेला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आमच्या संघाचे लक्ष्य जगात नंबर वन बनण्याचे आहे, असे त्या वेळी रहाणेने सांगितले. रहाणेच्या कारकीर्दीतील सर्वांत लक्षणीय बाब म्हणजे तो विदेशात खूप प्रभावी ठरला आहे. भारतीय संघाने जेव्हा, केव्हा विदेश दौरा केला, तेव्हा रहाणेने निश्चितपणे धावा काढल्या.
भारतीय संघात पहिल्यांदा निवड झाली तेव्हाची आठवण सांगताना रहाणे म्हणाला, ‘बीसीसीआयने फोन करून मला संघ निवडीबाबत माहिती दिली तेव्हा मी स्तब्ध झालो होतो. क्षणभर माझा विश्वासच बसला नव्हता. मी याबाबत सर्वांत आधी माझ्या आईला सांगितले. आम्ही सर्वजण खूप खुश झालो. मी जवळपास ६ वर्षे देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत खेळत हाेतो. मेहनत सार्थकी लागली होती.’
तो म्हणाला, ‘भारताचे प्रतिनिधित्व करणे, हे माझे पहिले लक्ष्य होते. मी माझा पहिला टी-२० सामना २०११ मध्ये खेळला होता. सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी, वीरेंद्र सेहवाग त्या वेळी संघात होते. मी खूप घारबलेला होतो. मात्र, त्या सर्वांनी मला मदत करून सर्व काही सहज बनवले. त्यांनी सर्वांनी मला स्वत:ला अभिव्यक्त करण्याचा विश्वास दिला.’
सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड माझे आदर्श आहेत. या दोघांकडून मला खूप काही शिकण्यास मिळाले आहे, असे रहाणेचे म्हणणे आहे. तो म्हणाला, “सचिन, द्रविड माझे आदर्श आहेत. या दोघांना त्यांच्या क्रिकेट प्रतिभेमुळे मैदान आणि मैदानाबाहेरही लोक पसंत करतात. जगभर या दोघांचे चाहते आहेत.’ रहाणे सध्या भारताचा आघाडीचा फलंदाज आहे.
बातम्या आणखी आहेत...