आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रमवारीत काेहलीची दुसऱ्या स्थानावर धडक, टीम इंडिया तिसऱ्या स्थानी कायम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुबई - अायसीसीच्या वनडे क्रमवारीत विराट काेहलीने प्रगती साधली. त्याने फलंदाजीच्या क्रमवारीत दुसरे स्थान गाठले. दुसरीकडे टीम इंडियाने क्रमवारीतील अापले तिसरे स्थान कायम ठेवले अाहे. क्रमवारीतील टाॅप-१० गाेलंदाजांमध्ये भारताच्या एकाही खेळाडूला स्थान मिळवता अाले नाही. अायसीसीने शुक्रवारी वनडेची क्रमवारी जाहीर केली. अाॅस्ट्रेलियन संघ १२४ गुणांसह क्रमवारीत अव्वल स्थानावर अाहे. त्यापाठाेपाठ न्यूझीलंडने ११३ गुणांसह दुसरे स्थान काबीज केले.

वनडे फलंदाजांच्या टाॅप-१० मध्ये भारताच्या राेहित शर्मा अाणि शिखर धवनने स्थान मिळवले अाहे. राेहितने सातवे स्थान गाठले. त्यापाठाेपाठ शिखर धवन हा अाठव्या स्थानावर अाहे. यात अाफ्रिकेच्या चार फलंदाजांनी टाॅप-१० मध्ये स्थान मिळवले अाहेत. क्विंटन डिकाॅकने ९ वे अाणि फाफ डुप्लेसिसने १० वे स्थान पटकावले अाहे. गाेलंदाजीमध्ये विंडीजच्या सुनील नरेनने अव्वल स्थान गाठले अाहे. ट्रेंट बाेल्टने (न्यूझीलंड) दुसरे अाणि अाॅस्ट्रेलियाच्या मिशेल स्टार्कने तिसरे स्थान पटकावले.
डिव्हिलर्स अव्वल
अायसीसीच्या फलंदाजी क्रमवारीत दक्षिण अाफ्रिकेचा डिव्हिलर्स अव्वल स्थानावर अाहे. त्यापाठाेपाठ भारताच्या विराट काेहलीने दुसऱ्या स्थानावर धडक मारली. तसेच दक्षिण अाफ्रिकेचा हाशिम अामला क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर अाहे.

टाॅप-५ वनडे टीम
१. अाॅस्ट्रेलिया, २. न्यूझीलंड, ३. भारत, ४. द. अाफ्रिका, ५. इंग्लंड
बातम्या आणखी आहेत...