आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुंबळेच्या वाढदिवसाचे विमानात सेलिब्रेशन! लक्ष्मणसह मांजरेकर आणि कार्तिकची उपस्थिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतीय संघाचा माजी दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळेच्या वाढदिवसाचे मोठ्या जल्लोषात विमानातच सेलिब्रेशन करण्यात आले. याप्रसंगी माजी कसोटीपटू व्हीव्हीएस लक्ष्मणसह संजय मांजरेकर आणि मुरली कार्तिक उपस्थित होते. हे सर्वजण भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या वनडेसाठी राजकोटला रवाना झाले. याचदरम्यान शनिवारी कुंबळेचा वाढदिवस विमानात साजरा करण्यात आला. या वेळी कुंबळेने वाढदिवसाचा केकही कापला. तसेच लक्ष्मणने कापलेला केकही कुंबळेच्या चेहऱ्याला लावला. याचीही काही छायाचित्रे टि्वट करण्यात आली. आपल्या जुन्या मित्रांसोबत अशा प्रकारे साजरा केलेला हा वाढदिवस अधिकच खास ठरला, असे टि्वट कुंबळेने या वेळी केले. या सोहळ्यादरम्यान मांजरेकर आणि मुरली कार्तिकने वाढदिवसाचे गाणेही गायले.