आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day Spl: टेस्टमध्ये शतकांवर शतक झळकावणाऱ्या गावसकरांचे वनडेत केवळ एक शतक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुनील गावस्कर क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहीले गेलेले एक नाव. भारतीय क्रिकेटमध्ये गावस्कर यांचे फार मोठे योगदान आहे. त्यांच्या 16 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दित त्यांनी अनेक रेकॉर्ड प्रस्थापित केले होते. त्यांनी आंतरराष्ट्रीय स्थरावर एकूण 35 शतके केली आहेत. क्रिकेटच्या इतिहासात एक महान सलामीवीर म्हणून ते ओळखले जात. त्यांनी खेळलेल्या 125 कसोटी सामन्यांमध्ये 10,122 धावा फटकावल्या आहेत. ते कसोटी सामन्यांमध्ये 10 हजार धावा करणारे पहिलेच फलंदाज आहेत. त्यांचे कसोटी सामन्यांतील 34 शतकांचे रेकॉर्ड साधारणपणे 20 वर्षांपर्यंत त्यांच्याच नावावर होते. डिसेंबर 2005 मध्ये हे रेकॉर्ड सचिन तेंडूलकरने त्याच्या नावावर केले आहे. मात्र वनडे सामन्यांचा विचार कला तर, त्यांना वनडेमध्ये केवळ एकच शतक करता आले आहे.

गावस्कर यांनी मार्च 1971 मध्ये वेस्टइंडीज विरुद्ध टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यांनी कारकिर्दितील पहिले शतक त्याच मालिकेतील तीसऱ्या सामन्यात केले होते. क्वींसपार्क ओवल येथे शेवटच्या सामन्यात त्यांनी दोन्ही डावांत प्रत्येकी 124 आणि 220 धावा केल्या होत्या. अशी कामगिरी करणारे ते दुसरे भारतीय खेळाडू होते. डिसेंबर 1978 मध्ये वेस्टइंडीज विरूद्ध दोन्ही डावांत प्रत्येकी 107 आणि नाबाद 182 धावा करून ते टेस्ट क्रिकेटच्या दोन्ही डावांत तीन वेळा शतक करणारे पहिले फलंदाज होते.

गावस्कर यांनी 1974 मध्ये इंग्लंडच्या विरुद्ध हेडिंग्ले स्टेडियमवर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात पदार्पण केले. मात्र एकदिवसीय करियरच्या तुलनेत त्यांचे टेस्ट करियर अधिक प्रभावी राहिले. एकदिवसीयमध्ये त्यांनी 108 सामने खेळताना 35.13 च्या सरासरीने 3092 धावा केल्या आहेत. यात त्यांचे केवळ एकमात्र एकदिवसीय शतक आहे. जे त्यांनी 1987 च्या विश्वचषकात न्यूझिलॅंड विरुद्ध फटकावले आहे. हा त्यांच्या एकदिवसीय करियरचा शेवटून दूसरा सामना होता. यात त्यांनी 88 चेंडूंमध्ये 103 धावा केल्या होत्या. या सामन्यात भारताचा विजय होऊन गावस्करांन 'मॅन ऑफ द मॅच' घोषित करण्यात आले.

पुढील स्लाइडवर पाहा, सुनिल गावस्करविषयी काही खास माहिती....