आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुसरा टी-20: किवीजची मालिकेत बराेबरी; भारताचा दुसरा माेठा पराभव; बाेल्टचे 4 बळी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजकाेट- काेलीन मुन्राे (नाबाद १०९) अाणि ट्रेंट बाेल्टच्या (४/३४) यांच्या तुफानी खेळीच्या बळावर पाहुण्या न्यूझीलंडने शनिवारी यजमान टीम इंडियाचा मालिका विजयाचा प्रयत्न हाणून पाडला. न्यूझीलंडने दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतावर ४० धावांनी शानदार विजय संपादन केला. यासह न्यूझीलंडच्या टीमने तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेमध्ये १-१ ने बराेबरी साधली. अाता मालिकेतील तिसरा अाणि निर्णायक सामना मंगळवारी हाेणार अाहे. न्यूझीलंडला सलामी सामन्यात पराभवाला सामाेरे जावे लागले हाेते. टी-२० मध्ये भारताचा दुसरा माेठा पराभव ठरला.  

  मार्टिन गुप्तिल (४५) अाणि काेलीन मुन्राे यांच्या शतकी भागीदारीच्या बळावर न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना दाेन गड्यांच्या माेबदल्यात भारतासमाेर विजयासाठी १९७ धावांचे लक्ष्य ठेवले हाेते. प्रत्युत्तरात ट्रेंट बाेल्टने धारदार गाेलंदाजी करताना पाठलाग करणाऱ्या टीम इंडियाला १५६ धावांमध्ये राेखले.  यासह न्यूझीलंडने सामना जिंकला. 

काेहलीचे अर्धशतक
टीम इंडियाचा कर्णधार विराट काेहलीने (६५) तुफानी खेळी करताना अर्धशतक ठाेकले. त्याने ४२ चेंडूंत ८ चाैकार अाणि १ षटकारांसह ६५ धावांची खेळी केली.
 
अाठवा सातहजारी  
अांतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये ७ हजार धावांचा पल्ला गाठणारा काेहली हा अाठवा फलंदाज ठरला. तसेच भारताचा पहिला फलंदाज अाहे. त्याने ७०५५ धावा पूर्ण केल्या अाहेत. यामध्ये १० हजार ५७१ धावांसह विंडीजचा स्फाेटक फलदंाज गेल अव्वलस्थानी अाहे.   
 
> काेेहलीच्या नावे विराट विक्रमाची नाेंद : टीम इंडियाचा कर्णधार काेहलीने (६५) अापल्या नावे विराट विक्रमाची नाेंद केली.  
 
दिलशानला टाकले मागे 
काेहलीने टी-२० मध्ये सर्वाधिक धावांत  दिलशानला मागे टाकले. यासह त्याने दुसरे स्थान गाठले. काेहलीच्या अाता १,९४३ धावा झाल्या. दिलशानच्या नावे १८८९ धावा अाहेत. मॅक्लुम २१४० धावांसह अव्वल स्थानावर अाहे.  
 
 
चाैकारांचे द्विशतक 
काेहलीने  टी-२० क्रिकेट करिअरमध्ये चाैकाराचे द्विशतक ठाेकले. त्याचे २०८ चाैकार झाले. असे करणारा ताे जगातील तिसरा फलंदाज ठरला. यापूर्वी पाकच्या माे. शहजाद व दिलशानच्या नावे चाैकाराचे द्विशतक अाहे.
बातम्या आणखी आहेत...