आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

LIVE IND-SL : श्रीलंकेला दुसरा झटका, भुवनेश्वरने केले सदिराला आऊट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रविंद्र जडेजा 22 धावांवर आऊट झाला. - Divya Marathi
रविंद्र जडेजा 22 धावांवर आऊट झाला.

कोलकाता : भारत - श्रीलंका कसेाटी सामन्यात पहिल्या इनिंगमधील श्रीलंकेच्या फलंदाजीला सुरुवात झाली. खेळ सुरु झाल्यावर काही क्षणातच 2 विकेटवर 24 धावा श्रीलंकेने केल्या. 

 

श्रीलंकेविरूद्ध सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या सुरुवातील भारताने पहिल्या इनिंगमध्ये दहा विकेट गमावून 172 धावा केल्या आहेत. चेतेश्वर पुजारा 52 धावा काढून आऊट झाला आहे. सामन्याच्या सुरुवातीला दोन दिवस पावसाच्या व्यत्ययामुळे 32.5 षटकांचा खेळ झाला होता. मोहम्मद शमीने शेवटच्या विकेटसाठी 22 चेंडूत 24 धावा संघासाठी केल्या.

 

साहाला मिळाली होती लाईफलाईन

- सामना सुरु असतांना साहाला 50 वे षटक सुरु असतांना रिद्धीमान साहाला एक लाईफलाईन मिळाली होती. परेराच्या चेंडूवर डिकवेलाने स्टंपिंग सोडले होते. साहा 25 धावांवर खेळत होता. मात्र या लाईफलाईनचा फायदा साहाला घेता आला नाही.

 

पुजाराचे अर्धशतक
- सामन्यात भारतातर्फे चेतेश्वर पुजाराने शानदार फलंदाजी करीत अर्धशतक ठोकले. कसोटी करीअरमधील हे 16 वे अर्धशतक ठरले.
- पुजारा 117 चेंडूमध्ये 52 धावा केल्या. अर्धशतक पूर्ण करण्यास 108 चेंडू खेळावे लागले.
- आऊट होण्यापूर्वी पुजाराने धवनच्या साथीने 13, विराटसोबत 4, रहाणे सोबत 13, अश्विनसोबत 20 आणि साहासोबत 29 धावांची पार्टनरशीप केली.

 

असा होता दोन दिवसांचा खेळ

- कसोटी सामन्यात टॉस जिंकून श्रीलंकेने भारताला फलंदाजीस उतरविले. त्यानंतर भारताची फलंदाजी बहरू शकली नाही. संघाचे पहिल्याच दिवशी 3 विकेट देऊन 17 धावा होत्या. पावसामुळे पहिल्या दिवशी फक्त 12 षटकांचा सामना खेळण्यात आला.

- सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पावसाने आणखी अडचणी वाढवून 20 षटकांचा खेळ झाला. खेळ थांबेपर्यंत पहिल्या इनिंगमध्ये 32.5 षटकांत पाच विकेट जाऊन 74 धावा करता आल्या.

बातम्या आणखी आहेत...