आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

IND-SL : भारत-श्रीलंका पहिला कसोटी सामना ड्रॉ, दुसऱ्या इनिंगमध्ये श्रीलंकेच्या 7 गडी बाद 75 धावा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता -  भारत आणि श्रीलंकेदरम्यान सुरु असलेला पहिला कसोटी सामना रद्द झाला. पाचव्या दिवशी अंधुक प्रकाशामुळै सामना काही वेळापूर्वी थांबविण्यात आला. 231 धावांचा पाठलाग करतांना श्रीलंकेने दुसऱ्या इनिंगमध्ये 7 गडी गमावून 75 धावा केल्या. भुवनेश्वर कुमारने शानदार गोलंदाजी करीत 4 विकेट पटकावल्या. दुसरीकडे मोहम्मद शमीला 2 आणि उमेश यादवला 1 विकेट मिळाल्या. दुसऱ्या इनिंगमध्ये जडेजालने एक ओव्हर टाकले. अश्विनला गोलंदाजीची संधीच मिळाली नाही.

 

असा होता कसोटी सामना 

- भारताने पहिली फलंदाजी करीत 172 धावा केल्या होत्या. त्याला प्रत्युत्तर देतांना श्रीलंकेने पहिल्या इनिंगमध्ये 294 धावा जोडल्या. 
- दुसऱ्या इनिंगमध्ये टीम इंडिचा कर्णधार विराटच्या शतकाच्या बळावर आठ विकेट गमावून भारताने 352 धावा केल्या. शतक पूर्ण झाल्यावर भारताने आपला खेळ घोषित केला. लकमल आणि शनाकाने प्रत्येकी तीन विकेट घेतल्या.

- पाचव्या दिवसाचा खेळ सुरु झाल्यावर श्रीलंकेची सुरुवात चांगली झाली नाही. पहिली विकेट फक्त 2 धावसंख्या असतांना गेली. त्यानंतर श्रीलंकेने 7 विकेट गमावून 75 धावा केल्या. दुसऱ्या इनिंगमध्ये भुवनेश्वरने 4 विकेट पटकावल्या. 

 

श्रीलंकेविरूद्ध सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी भारताने दुसऱ्या इनिंगमध्ये 2 विकेट गमावून 203 धावा केल्या होत्या. पाचव्या दिवशी खेळ सुरु झाल्यावर टीम इंडियाने केएल राहुलची विकेट गमावली. राहुलने सामना सुरु झाल्यावर 73 धावसंख्येत केवळ 6 धावा काढून 79वर विकेट गमावली. चौथ्या दिवशी शिखर धवन शतकापासून सात धावांनी दूर राहिला. 


चौथ्या दिवशी 10 चेंडूत श्रीलंकेच्या 3 विकेट
- सामन्याच्या चौथ्या दिवशी पाहुण्या संघाने 4 विकेटवरून 165 धावांसह खेळ सुरु केला होता. 52.4 षटकांमध्ये धावसंख्या 200 पर्यंत पोहोचली होती. मात्र काही वेळाने अवघ्या दहा चेंडू श्रीलंकेचे तीन फलंदाज गारद झाले.
- तिसऱ्या दिवशीच्या सामन्याच्या तुलनेत श्रीलंकेचे बहुतांश फलंदाज 129 धावसंख्या उभारून तंबूत परतले.

 

तिसऱ्या दिवशी असे आऊट झाले श्रीलंकेचे फलंदाज
- पहिल्या इनिंगमध्ये श्रीलंकेला पहिला झटका 4.5 षटकामध्ये बसला. तेव्हा स्कोर 29 होता. त्यानंतर सातव्या षटकांत लगेचच दुसरी विकेट पडली.
- त्यापाठोपाठ 37 व्या षटकात 133 धावसंख्या असतांना श्रीलंकेचा तिसरा गडी बाद झाला. तिसऱ्या विकेटसाठी लाहिरू आणि एंजेलो यांनी 99 धावांची भागिदारी केली.

 

अशी राहिली भारताची पहिली इनिंग
- कसोटी सामन्याची पहिली इनिंग भारतासाठी चांगली ठरली नाही. एकापाठोपाठ एक पहिल्या दिवशी 12 षटकांत 3 विकेट भारताने गमावल्या. 
- दुसऱ्या दिवशी पावसाने व्यत्यय आणल्याने 21 षटकांचा सामना झाला. खेळ थांबला तेव्हा भारताने 5 गडी गमावून 74 धावा केल्या होत्या.
- तिसऱ्या दिवशी भारताने 74 धावांपुढे खेळ सुरु केला. त्यानंतर 5 फलंदाज 98 धावा काढून तंबूत परतले.

बातम्या आणखी आहेत...