आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अश्विनचे बळी; भारताची मजबूत पकड; श्रीलंकेच्या पहिल्या डावात दिवसअखेर 9 बाद 356 धावा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- माजी कर्णधार मॅथ्यूज (१११) अाणि कर्णधार दिनेश चांदिमलने (नाबाद १४७) भारताविरुद्ध तिसऱ्या कसाेटीत अडचणीत सापडलेल्या श्रीलंकेला सावरणारी खेळी केली. यामुळे पाहुण्या टीमने तिसऱ्या दिवसअखेर साेमवारी पहिल्या डावात ९ बाद ३५६ धावांची खेळी केली. दरम्यान, अार. अश्विनने (३/९०) शानदार गाेलंदाजी करताना यजमान भारताची कसाेटीवरची पकड अधिक मजबूत केली. याशिवाय रवींद्र जडेजा, इशांत शर्मा अाणि शमीने अाज प्रत्येकी एक गडी बाद केले. त्यामुळे अाता त्याच्या नावे प्रत्येकी २ बळींची नाेंद झाली. अाता  भारताकडे १८० धावांची अाघाडी अाहे. भारताने पहिल्या डावात ५३६ धावांचा डाेंगर उभा केला अाहे.   

श्रीलंकेचा अाता चांदिमल अाणि संदाकन हे दाेघे मैदानावर खेळत अाहे. अद्याप १८० धावांनी पिछाडीवर असलेल्या श्रीलंकेकडे १ विकेट अाहे.  


शेवटच्या सत्रात पाच विकेट : पाहुण्या श्रीलंकन टीमने कालच्या ३ बाद १३१ धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. दरम्यान, टीमने लंच ब्रेकपर्यंत ३ गडी गमावले. यातून टीमला १९२ धावांपर्यंत मजल मारता अाली हाेती. त्यानंतर टी टाइमपर्यंत श्रीलंकेच्या ४ विकेट पडल्या.  त्यामुळे श्रीलंकेला २७० धावांचा पल्ला गाठता अाला. यामध्ये २६ धावांची भर घालताना श्रीलंकेने  अापली पाचवी विकेट गमावली. दरम्यान, श्रीलंकेने ३४३ धावांपर्यंत ९ गडी गमावले.   


पदार्पणात डिसिल्वाचा भाेपळा

श्रीलंकन टीमकडून अांतरराष्ट्रीय कसाेटी करिअरला सुरुवात करण्याची युवा फलंदाज डिसिल्वाला माेठी संधी मिळाली. मात्र, त्याला याच संधीला सार्थकी लावता अाले नाही. ताे अापल्या पदार्पणातील कसाेटीच्या पहिल्यात डावात शून्यावर बाद झाला. त्याने चार चेंडूंचा सामना केला. मात्र, त्याला शेवटपर्यंत धावा काढता अाली नाही. त्यानंतर त्याला अश्विनने बाद केले. त्यामुळे ताे मैदानावर हजेरी लावून अाल्यापावली माघारी पॅव्हेलियनमध्ये परतला.   


फाॅलाेअाॅनची नामुष्की टाळली

 सुमार खेळीमुळे सध्या पाहुण्या श्रीलंका टीमवर पराभवाचे सावट निर्माण झालेले अाहे. यातच टीमला फाॅलाेअाॅनच्या नामुष्कीला सामाेरे जावे लागणार हाेते. मात्र, वेळीच माजी कर्णधार मॅथ्यूज  अाणि कर्णधार चांदिमल यांनी सुरेख शतकी खेळी केली. यातून त्यांनी अापल्या संघाचा डाव सावरताना फाॅलाेअाॅनची नामुष्कीही टाळली. याशिवाय त्यांची दिवसभरातील खेळीही महत्त्वाची ठरली. कारण इतर फलंदाजांना फार काळ मैदानावर अापले अाव्हान कायम ठेवता अाले नाही. दरम्यान, भारताच्या चारही गाेलंदाजांनी सुरेख खेळी केली. 

 

अश्विनचे कमबॅक 
पहिल्या डावाच्या दुसऱ्या दिवशी काहीसा अपयशी ठरलेल्या अार. अश्विनने शानदार कमबॅक केले. त्याने तिसऱ्या दिवशी भारताकडून सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. यादरम्यान त्याने मॅथ्यूज (१११), सिल्वा (०) अाणि डिकवेला (०) यांना झटपट बाद केले. याशिवाय रवींद्र जडेजा, ईशांत अाणि शमीने प्रत्येकी एक गडी बाद केला.  

 

मॅथ्यूजचे ३७ डावांनंतर शतक 
श्रीलंकेचा माजी कर्णधार अँजेलाे मॅथ्यूजने दाेन वर्षांनंतर अापले कसाेटी शतक साजरे केले. यामध्ये त्याला ३७ डावांनंतर हे यश िमळाले. त्याचे दाेन वर्षे अाणि ३७ डावांनंतरचे हे पहिले शतक ठरले. त्याने अापले शेवटचे शतक २०१५ मध्ये काेलंबाेत भारताविरुद्ध कसाेटीत ठाेकले हाेते. अाता त्याने २६८ चेंडूंचा सामना करताना १४ चाैकार अाणि २ षटकारांच्या अाधारे १११ धावांची खेळी केली. यासह त्याला चांगला फाॅर्म गवसला.

 

जीवदानाचा मॅथ्यूजला मिळाला फायदा
भारताच्या खेळाडूंनी क्षेत्ररक्षणादरम्यान केेलेल्या काही चुकांचा श्रीलंकन टीमला माेठा फायदा मिळाला. यातूनच माजी कर्णधार मॅथ्यूजला शतक ठाेकता अाले. त्याला चार वेळा जीवदान मिळाले. मैदानावर त्याच्या ६, ९३, ९८ व १०४ धावांवर असताना चार वेळा झेल ड्राॅप झाले.

 

चांदिमलचे सर्वात वेगवान दहावे शतक 

श्रीलंकेचा कर्णधार चांदिमलने  अापल्या पदाला साजेशी खेळी केली. त्याने ३४१ चेंडूंचा सामना करताना १८ चाैकार अाणि एका षटकाराच्या अाधारे नाबाद १४७ धावांची खेळी केली. यासह ताे सर्वात वेगवान दहावे कसाेटी शतक ठाेकणारा पहिला फलंदाज ठरला. त्याने ८० व्या डावात हा विक्रमी पल्ला गाठला. यामध्ये त्याने अापल्या देशाच्या समरवीराला मागे टाकले. समरवीराच्या नावे ८४ डावांत दहा कसाेटी शतकांची नाेंद हाेती.   

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, सामन्याचे आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...