आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • LIVE Rio Olympics: PV Sindhu Vs Carolina Marin For Gold In Women’S Singles Final

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सिंधूचे खरे सोने; ९२ वर्षांत रौप्यपदक जिंकणारी देशाची पहिली महिला...!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिअाे - शटलर पी. व्ही. सिंधू ऑलिम्पिकच्या महिला एकेरीच्या फायनलमध्ये स्पॅनिश खेळाडू कॅरोलिना मरिनला हरवू शकली नाही. तिला रौप्यपदक मिळाले. १९२४ पासून भारत ऑलिम्पिकमध्ये महिला खेळाडू पाठवतो. तेव्हापासून पहिल्यांदाच एखाद्या महिलेने रौप्यपदक जिंकले आहे. जागतिक क्रमवारीत नंबर १ मरिनने सिंधूला १९-२१,२१-१२, २१-१५ ने पराभूत केले. पहिलेच ऑलिम्पिक खेळणाऱ्या सिंधूने मरिनला कडवी झुंज दिली. यापूर्वी पाचही सामने मरिनने दोन गेममध्ये संपवले होते.

सिंधू-मरिन दरम्यान १२ वर्षांनंतर रंगली सर्वात प्रदीर्घ अंतिम लढत
- ८० मिनिटे रंगले फायनल. २००८ नंतर सर्वात प्रदीर्घकाळ चालली लढत.
- कॅरोलिना मरिनला रिओत प्रथमच तीन गेमपर्यंत खेळणे भाग पडले.
- भारताला सलग दुसरे ऑलिम्पिक बॅडमिंटन पदक मिळाले. २०१२ मध्ये सायना नेहवालने कांस्य जिंकले होते.
- चीनने १६ वर्षांनंतर प्रथमच महिला एकेरीत एकही पदक जिंकले नाही.
- बॅडमिंटनच्या २५ ऑलिम्पिक सुवर्ण पदकांपैकी चीनने १६ जिंकली आहेत.
पिछाडीनंतर मात : पहिल्या गेममध्ये मरिनने प्रारंभापासून १५ व्या गुणापर्यंत सतत ३ ते ४ गुणांचे अंतर राखले. मात्र, त्यानंतर सिंधूने सलग सात गुण मिळवत मरिनवर २१ -१९ अशी मात केली.
दुसऱ्या गेमममध्ये मरिनचे वर्चस्व : पहिला गेम हातातून निसटलेल्या मरिनने दुसऱ्या गेममध्ये अत्यंत अाक्रमक खेळ करत हा गेम २१ -१२ असा जिंकला.
तिसरा गेम श्वास राेखणारा : तिसऱ्या गेममध्ये मरिनने ६ -१ अशी अाघाडी घेतली. माेठ्या रॅलीतील गुण मिळवत सिंधूने तिच्याशी १०-१० अशी बराेबरी साधली. अखेरीस हा गेम मरिनने २१ -१५ असा जिंकून घेत सुवर्णपदकावर नाव काेरले.

यामुळे सिंधू फायनल हरली...
- सिंधूच्या तुलनेत मरिन खूप आक्रमक खेळली. याचा मरिनला फायदा झाला.
- सिंधूने आपल्या डावा बाजूला बॅकड्रॉपवर खूप गुण दिले. मरिनने येथे वारंवार गुण घेतले.
- मरिनचे स्मॅशशॉट अप्रतिम होते. तिने बरेच गुण सिंधूवर बॉडी लाइन स्मॅश मारत जिंकले.
- सिंधू संपूर्ण सामन्यात नर्व्हस दिसली. देहबोलीवरून आत्मविश्वासही झळकत नव्हता.
अाक्रमकतेसाठी सिंधूला मिळाला जोरात अाेरडण्याचा गुरुमंत्र
अाॅलिम्पिकमध्ये प्रत्येक गुण जिंकल्यानंतर सिंधू जाेरात अाेरडून तिचा अानंद व्यक्त करीत अाहे. मात्र, यापूर्वी असे नव्हते. ती अत्यंत शांतचित्ताने खेळायची. परंतु, गाेपीचंद यांनी तिच्यातील अाक्रमकता वाढवण्यासाठी तिला गुण मिळवल्यानंतर जाेरात अाेरडण्याची सवय अंगी बाणवायला सांगितली. एके दिवशी गाेपीचंदने सांगितले तुझ्यातील अाक्रमकता मला पहायची अाहे, जाेरात अाेरड. सिंधू प्रारंभी तयार नव्हती. सिंधू अाेरडत नसल्याचे बघून गाेपीचंदनी तिला सांगितले जाेपर्यंत तू जाेरात अाेरडणार नाहीस, ताेपर्यंत मी तुला रॅकेटला हात लावू देणार नाही. त्या क्षणी सिंधूला रडूच काेसळले. मात्र, गाेपीसरांचा अादेश मानत तिने माेठ्या अावाजात हुंकार भरला. तेव्हापासून ती प्रत्येक गुण मिळाल्यावर जाेरात अाेरडून तिच्या गुणप्राप्तीचा अानंद व्यक्त करते.
पुढे वाचा, चीनच्या भिंतीला भगदाड पाडणारे दोन कोच...

बातम्या आणखी आहेत...