आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DD vs KKR: पांडे-युसूफची अर्धशतके; केकेआरचा चौथा विजय!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आयपीएल-१० मध्ये सोमवारी कोलकाता नाइट रायडर्सने शानदार कामगिरी करताना दिल्ली डेअरडेव्हिल्सला ४ विकेटने हरवले. या सत्रात कोलकात्याचा हा पाच सामन्यांतील चौथा विजय ठरला.
 
या विजयासह केकेआरची टीम पुन्हा गुणतालिकेत अव्वलस्थानी पोहोचली आहे. दुसरीकडे दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाचा चार सामन्यांतील हा दुसरा पराभव ठरला. केकेआरकडून युसूफ पठाण आणि मनीष पांडे यांनी शानदार कामगिरी करताना अर्धशतके ठोकली. दोघांनी शतकी भागीदारी करून विजयात योगदान दिले. नाबाद ६९ धावा ठोकणारा मनीष पांडे ‘मॅन ऑफ द मॅच’ ठरला.
 
जहीर खानने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. संजू सॅमसन (३९) आणि बिलिंग्स (२१) यांनी ५३ धावांची सलामी दिली. करुण नायरने २७ चेंडूंत २१ धावांची संथ खेळी केली. श्रेयस अय्यरने १७ चेंडूंत २६ धावा काढल्या. युवा फलंदाज ऋषभ् पंतने अवघ्या १६ चेंडूंत ४ षटकार आणि २ चौकारांसह ३८ धावा ठोकल्या. त्याने उमेश यादवच्या एका षटकात २ षटकार, ३ चौकारांसह २६ धावा कुटल्या. मॅथ्यूज केवळ एक धाव काढू शकला. मॉरिसने १६ धावांचे योगदान देऊन दिल्लीला ७ बाद १६८ धावांपर्यंत पोहोचवले.
 
प्रत्युत्तरात केकेआरची सुरुवात चांगली झाली नाही. ३ षटकांत ३ विकेट गमावल्या. ग्रँडहोम १, कर्णधार गंभीर १४ आणि रॉबिन उथप्पा ४ धावा काढून बाद झाले. यानंतर मनिष पांडे आणि युसूफ पठाणने शानदार खेळ करून डाव सावरला.

धावफलक
दिल्ली डेअरडेव्हिल्स    धावा     चेंडू     ४    ६
सॅमसन झे. उथप्पा गो. उमेश    ३९    २५    ०७    ०
बिलिंग्स झे. उथप्पा गो. नाईल    २१    १७    ०२    ०
करुण नायर त्रि. गो. नाईल    २१    २७    ०१    ०
श्रेयस अय्यर धावबाद    २६    १७    ०४    ०
ऋषभ् झे. गंभीर गो. नाईल    ३८    १६    ०२    ४
मॅथ्यूज त्रि. गो. नरेन    ०१    ०४    ००    ०
मॉरिस झे. उमेश गो. वोक्स    १६    ०९    ०३    ०
पॅट कमिन्स नाबाद    ०३    ०४    ००    ०
अवांतर : ३. एकूण : २० षटकांत ७ बाद १६८ धावा. गडी बाद होण्याचा क्रम : १-५३, २-६३, ३-१०६, ४-११०, ५-१४५, ६-१५३, ७-१६७. गोलंदाजी : कुल्टर नाईल ४-०-२२-३, क्रिस वोक्स ४-०-३१-१, उमेश यादव ४-०-५३-१, सुनील नरेन ४-०-२०-१, कुलदीप यादव ३-०-२९-०, ग्रँडहोम १-०-१२-०.
 
कोलकाता नाइट रायडर्स    धावा     चेंडू     ४    ६
गंभीर झे. मॅथ्यूज गो. जहीर    १४    १२    ०२    ०
ग्रँडहोम झे. बिलिंग्स गो. जहीर    ०१    ०२    ००    ०
उथप्पा झे. ऋषभ् गो. कमिन्स    ०४    ०२    ०१    ०
मनिष पांडे नाबाद    ६९    ४९    ०४    ३
युसूफ पठाण झे. व गो. मॉरिस    ५९    ३९    ०६    २
सूर्य झे. जहीर गो. कमिन्स    ०७    ०९    ००    ०
वोक्स यष्टीचीत गो. मिश्रा    ०३    ०५    ००    ०
सुनील नरेन नाबाद    ०१    ०१    ००    ०
अवांतर : ११. एकूण : १९.५ षटकांत ६ बाद १६९ धावा. गडी बाद होण्याचा क्रम : १-५, २-१९, ३-२१, ४-१३१, ५-१५२, ६-१६०. गोलंदाजी : जहीर खान ४-०-२८-२, पॅट कमिन्स ४-०-३९-२, क्रिस मॉरिस ४-०-३०-१, अमित मिश्रा २.५-०-२६-१, मो. शमी ३-०-२८-०, मॅथ्यूज २-०-१५-०.
 


पुढील स्लाइड्सवर पाहा, DD vs KKR लढतीचे फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

 
बातम्या आणखी आहेत...