आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोढा समितीने दिली बीसीसीआययला संधी!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अयाज मेमन यांच्या लेखणीतून....

न्यायमूर्ती अार.एम. लाेढा समितीने भारतीय क्रिकेट नियामक मंडळात महत्त्वपूर्ण बदल घडवून अाणण्यासाठी शिफारशी केल्या अाहेत. क्रिकेटमध्ये विकासात्मक असे बदल घडवून अाणण्यासाठी अावश्यक असणारे सर्वच पैली त्यांनी याेग्य प्रकारे हाताळले. त्यामुळेच एकाही पैलूला त्यांनी वगळले नाही, ज्यातून बीसीसीअायच्या प्रशासनाला काेणतीही अाशा नसेल. समितीने काही महिन्यांपूर्वी अायपीएल टीम चेन्नई अाणि राजस्थान राॅयल्सवर दाेन वर्षांच्या बंदीच्या कारवाईची शिफारस केली हाेती. अाता ही समिती क्रिकेटमधील बदलावर अधिक भर देत अाहे. मात्र, यात बीसीसीअायला मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादाकडेही दुर्लक्ष करता येणार नाही. लाेढा समितीने प्रत्येक बाबीवर सखाेल प्रकाश टाकला तसेच प्रत्येक पैलूवर नजर टाकली. यामुळे देशात मलिन झालेली क्रिकेटची प्रतिमा सुधारण्यास मदत हाेईल. मात्र, यावर अनेकांचे मतभेदही हाेऊ शकतात. कारण यात काेणत्याही मंत्री, सरकारी अधिकारी व्यक्तींना बीसीसीअायचे पद भूषवण्यास मनाई केली अाहे. यातून मंडळातील कार्यपद्धतीमध्ये याेग्य प्रकारे पारदर्शकता निर्माण हाेईल अाणि क्रिकेटच्या विकासाला चालना मिळेल. तसेच मंडळातील प्रशासकही निवडणुकीतील विजयी उमेदवार असतील. याशिवाय राष्ट्रीय निवड समितीचा अध्यक्ष हा माजी कसाेटीपटू असावा, अशी शिफारस समितीने केली. यासारख्या अनेक चांगल्या शिफारशी करण्यात अाल्या. पाचएेवजी तीन निवडकर्ते करण्याच्या शिफारशीवर प्रश्नचिन्ह निर्माण हाेऊ शकते. याशिवाय क्रिकेटमधील सट्टेबाजीला वैध करण्याची गरज अाहे. मात्र, यासाठी संसदेने कायदा करण्याची गरज असल्याचेही समितीने सांगितले.


भारतीय क्रिकेटला याेग्य प्रकारे चालना देण्यासाठी अाणि अनेक त्रुटी दूर करण्यासाठी या समितीची शिफारस फायदेशीर अाहे. यातील अनेक गाेष्टींशी अापण सहमत अाहाेत. त्यामुळे ही शिफारस क्रिकेटला चालना देण्यासाठी महत्त्वाची अाहे. लाेढा समितीच्या शिफारशी कमी-अधिक प्रमाणात स्वीकारल्यास देशात क्रिकेटच्या प्रशासनात नव्याने विकासात्मक असे बदल हाेतील. मात्र, या केवळ शिफारशी अाहेत. त्यामुळे बीसीसीअायला सर्वाेच्च न्यायालयात अपील करण्याचा अधिकार अाहे. मात्र, याबाबत अपील केल्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या प्रतिष्ठेला धाेका पाेहचेल. कारण या शिफारशींच्या माध्यमातून बीसीसीअायला नव्याने सुरुवात करण्याची संधी मिळाली अाहे, असे यातून दिसून येते.