आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धोनीने फार्म हाऊसवर दिली PARTY; पाहुण्यांमध्ये अनुपम खेरसह ऑस्ट्रेलियन खेळाडू...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धोनीचे वडील पान सिंह, धोनी आणि अभिनेते अनुपम खेर... - Divya Marathi
धोनीचे वडील पान सिंह, धोनी आणि अभिनेते अनुपम खेर...
स्पोर्ट्स डेस्क - टी-20 सिरीजच्या पहिल्या सामन्यासाठी आधीच पोहोचलेल्या महेंद्र सिंह धोनीने आपल्या फार्म हाऊसवर एक पार्टी आयोजित केली. यात चित्रपटानिमित्त रांचीत असलेले ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर सुद्धा पोहोचले. या व्यतिरिक्त धोनीच्या पार्टीला स्टीव्ह स्मिथ, मोसेस हेनरिक्स आणि टिम पेन फार्म हाऊसवर आले होते. सोबतच धोनीने आपल्या जवळच्या मित्रांना देखील या मेजवाणीत निमंत्रित केले होते. 
 

- महेंद्र सिंह धोनीवर आलेल्या बायोपिकमध्ये अनुपम खेर यांनी धोनीचे वडील पान सिंह यांची भूमिका साकारली होती. यावेळी वडील पान सिंह आणि ऑन स्क्रीन वडील खेर दोघांनी धोनीसोबत फोटो काढला.
- अनुपम खेर एका चित्रपटाच्या कामानिमित्त रांचीत होते. धोनीने आपल्या पार्टीत त्यांनाही बोलावले. सोमवारी रात्री झालेल्या या पार्टीमध्ये खेर यांनी तासभर धोनीसोबत घालवला. अनुपम खेर झारखंड चित्रपट तंत्रज्ञान सल्लागार बोर्डाचे चेअरमन आहेत. 
- धोनीच्या डिनर पार्टीत सहभागी होण्यासाठी ऑस्ट्रेलियन कॅप्टन स्टीव्ह स्मिथ, मोसेस हेनरिक्स आणि टिम पेन एन्जॉय करताना दिसून आले. यासोबतच धोनीचे जवळचे मित्र सीमांत लोहानी आणि राजीव देखील उपस्थित होते. 
 

पुढील स्लाइड्सवर पाहा, धोनीच्या पार्टीचे आणि ऑस्ट्रेलियन टीमचे आणखी काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...