आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्राचे क्रिकेटपटू क्षमतावान : क्रिकेटपटू केदार जाधवच्या पत्रकारांशी गप्पा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- महाराष्ट्राच्या क्रिकेट संघात चार ते पाच चांगले खेळाडू असून अागामी दाेन-तीन वर्षात भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवण्याची त्यांची क्षमता अाहे. महाराष्ट्राच्या क्रिकेटपटूंनी मिळालेल्या संधीच्या वेळी बिनधास्त खेळून जागतिक स्तरावर दर्जेदार कामगिरी केली तर त्यांना भारतीय संघात सहजासहजी संधी मिळू शकते, असे मत भारताचा क्रिकेटपटू केदार जाधव याने बुधवारी व्यक्त केले.

केदार जाधव याने नुकतेच झिम्बाब्वे दाैऱ्यात पहिले अांतरराष्ट्रीय शतक केल्यानिमित्त, पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे त्याच्या वार्तालापाचे अायाेजन करण्यात अाले हाेते. या वेळी केदारचे वडील महादेव जाधव, पुणे पत्रकार संघाचे अध्यक्ष जितेंद्र अष्टेकर, सरचिटणीस याेगिराज प्रभुणे उपस्थित हाेते.
केदार म्हणाला, "क्रिकेट खेळण्याची मला अावड असल्याने, सन २००० मध्ये लेदर बाॅलवर मी क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. त्या वेळी किमान रणजी खेळली पाहिजे असे वाटत हाेते. २००४ मध्ये माझ्या पत्नीने अापणास लग्न करावयाचे असेल, तर तुला अायुष्यात काहीतरी करिअर करावे लागेल असे सांगितले. त्यानंतर मी क्रिकेटवर मेहनत घेऊन अाज भारतीय संघात स्थान िमळवले अाहे. क्रिकेटमध्ये माझी कामगिरी कधी खराब झाली तरी माझ्या घरच्यांनी मला दडपण न येऊ देता पाठिंबा िदला. माझ्या खेळण्याच्या शैलीनुसार मला वीरेंद्र सेहवाग अावडताे, तर मी संघात ज्या स्थानावर खेळताे त्यानुसार माझा अादर्श महेंद्रसिंग धाेनी अाहे. भविष्याचा खूप विचार न करता, वर्तमानकाळात माझी कामगिरी कशी राहील यावर मी भर देताे.'

माझी मुलगी लकी
दाेन महिन्यांपूर्वी मला मुलगी झाली. मुलगी ही माझ्यासाठी खूप नशीबवान ठरली असून मुलगी ही धनाची पेटी असल्याचा प्रत्यय मला मिळत अाहे. झिम्बाब्वेमध्ये माझे पहिले अांतरराष्ट्रीय शतक पूर्ण केल्यानंतर माझ्या अाईवडिलांच्या चेहऱ्यावरील अानंद माझ्या डाेळ्यांसमाेर अाला. त्यानंतर मॅच संपल्यानंतर गाडीत बसताना माझ्या मुलीचा फाेटाे पाहिल्यावर मला समाधान मिळाले. साेलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील जाधववाडी येथे माझ्या वडिलांचा जन्म झाला असून माझा जन्म व शिक्षण पुण्यातच झाल्याचे तो म्हणाला.