आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीम इंडियाच्या विजयात चमकला हा क्रिकेटर, एका रात्रीत स्टार बनला होता स्टार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
2012 IPL च्या वेळी एका पार्टीत... - Divya Marathi
2012 IPL च्या वेळी एका पार्टीत...
स्पोर्ट्स डेस्क - श्रीलंका विरुद्ध एकमेव टी-20 सामन्यात दणदणीत विजय मिळवून देण्यात मनीष पांडेयच्या फिफ्टीचा मोलाचा वाटा आहे. मनीषने कॅप्टन विराटसोबत कमालिची पार्टनरशिप करत श्रीलंकेवर मात केली. त्याने अवघ्या 36 बॉल्समध्ये 51 धावा केल्या. विशेष म्हणजे, टी-20 फॉर्मेटमुळेच हा क्रिकेटर एका रात्रीत स्टार बनला होता. त्याने आयपीएलमध्ये 73 बॉलवर 114 धावा ठोकल्या होत्या.
 

एका रात्रीत बनला स्टार
- क्रिकेट फॅन्सचा नायक बनलेल्या मनीषने ही कमाल आयपीएलच्या दुसऱ्या सीजनमध्ये रॉयल चॅलेन्जर्स बेंगलुरुकडून डेक्कन चार्जर्स विरोधात करून दाखवला होता. त्या मॅचमध्ये त्याने नाबाद 114 धावांची खेळी केली होती. जबरदस्त परफॉर्म करून तो एका रात्रीतच स्टार बनला होता. तो आयपीएलच्या मैदानावर पहिली सेंचुरी लावणारा पहिला क्रिकेटर ठरला.
 

फक्त 19 वर्षांचा होता मनीष
- 2008 मध्ये रणजी मॅच खेळणाऱ्या कर्नाटकचा हा बॅट्समन आयपीएल सेलेक्टर्सच्या नजरेत आला. यानंतर विराटच्या नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरु टीमने त्याला विकत घेतले. 2009 च्या आयपीएल सीजनमध्ये त्याने विक्रमी इनिंग खेळली तेव्हा, ते अवघ्या 19 वर्षांचा होता. 
- आयपीएलच्या इतिहासातील पहिले शतक ठोकून त्याने रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरु संघात आपले स्थान निश्चित केले होते. यानंतर आयपीएलमध्ये त्याला वरिष्ठ क्रिकेटर्ससारखी वागणूक मिळत गेली. बेंगळुरु व्यतीरिक्त पांडेयने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि पुणे वॉरियर्ससोबत सुद्धा खेळले आहे. 
- आयपीएलचे पहिले शतक ठोकणाऱ्या मनीषला 2015 मध्ये वनडे आणि टी-20 इंटरनॅशनलमध्ये डेब्यू करण्याची संधी मिळाली. 
 

पुढील स्लाइड्सवर पाहा त्याचे आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...