आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BCCI Waives Off $ 41.97 Million Claim On The West Indies Cricket Board

बीसीसीअायचा विंडीज क्रिकेट मंडळाला दिलासा, ४ काेटी २० लाख डाॅलरचा दंड माफ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने शुक्रवारी अार्थिक डबघाईस असलेल्या वेस्ट इंडीज क्रिकेट मंडळाला दिलासा देणारा निर्णय घेतला. दाेन वर्षांपूर्वी विंडीज टीम भारतविरुद्ध दाैरा अर्ध्यावर साेडून मायदेशी परतली हाेती. या प्रकरणी नुकसान भरपाई म्हणून बीसीसीअायने विंडीज मंडळाला ४ काेटी २० लाख डाॅलरचा दंड ठाेठावला हाेता. मात्र, अाता हा दंड भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने शुक्रवारी माफ केला, अशी माहिती बीसीसीअायचे अध्यक्ष शशांक मनाेहर यांनी दिली.

‘अाम्ही विंडीज मंडळावर लावलेला दंड पूर्णपणे माफ केला अाहे. अाता या मालिकेतील उर्वरित सामने हे अागामी २०१७ मध्ये खेळवण्यात येतील. अाम्ही यावर समाधानी अाहाेत,’अशी प्रतिक्रिया मनाेहर यांनी दिली.

क्रिकेट मंडळासाेबतच्या वेतनाच्या वादामुळे विंडीज टीमने भारताचा दाैरा अर्ध्यावर साेडण्याचा निर्णय घेतला. यामुळे बीसीसीअाय अाणि विंडीज क्रिकेट मंडळ यांच्यात वितुष्ट निर्माण झाले हाेते. तसेच या दाैऱ्यातील नुकसान भरपाई म्हणून बीसीसीअायने माेठा दंड ठाेठावला हाेता.
‘विंडीज क्रिकेट मंडळासाेबत अाम्ही चर्चा केली अाहे. अागामी काळात हा अर्ध्यावरचा दाैरा पूर्ण करण्याचे विंडीज मंडळाने अाश्वासन दिले अाहे. त्यामुळे अाता या मालिकेचे अाम्ही लवकरच वेळापत्रक तयार करणार अाहाेत, असेही शशांक मनाेहर यांनी सांगितले.