आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सचिनवर दबाव आणून निवृत्त केल्याच्या प्रश्नावर संदीप पाटील यांचे सूचक मौन !

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सचिन तेंडुलकरने नोव्हेंबर 2013 मध्ये आपल्या 200 व्या कसोटीनंतर निवृत्ती घेतली होती. - Divya Marathi
सचिन तेंडुलकरने नोव्हेंबर 2013 मध्ये आपल्या 200 व्या कसोटीनंतर निवृत्ती घेतली होती.
मुंबई - राष्ट्रीय निवड समितीवरचा चार वर्षांचा कालखंड कठीण होता. अनेकदा काही वादग्रस्त गोष्टींवर नाइलाजाने निर्णय घ्यावे लागले, असे मावळते अध्यक्ष संदीप पाटील यांनी न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेसाठीचा भारतीय क्रिकेट संघ जाहीर करताना सांगितले. यापुढील भारतीय संघांची निवड नवी निवड समिती करणार असून त्यासाठी बीसीसीआयने प्रथमच उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत. उमेदवारांची निवड यापुढे मुलाखतीद्वारे होणार असल्याचे संकेतही बीसीसीआयने दिले आहेत.

कारकीर्दीतील कठीण कालखंड आणि कटू घटनांबद्दल संदीप पाटील यांना वेगवेगळ्या पद्धतीने विचारल्यानंतरही त्यांनी काहीच स्पष्ट केले नाही. त्यांच्यावर थेट सचिन तेंडुलकरला दबाव आणून निवृत्त व्हायला लावले का? असा प्रश्न केला गेला. त्यावरही संदीप पाटील यांनी गुळमुळीत उत्तर दिले. ते म्हणाले, मी फक्त बीसीसीआयलाच उत्तर देण्यास बांधील आहे आणि काही गोष्टी गुलदस्त्यात राहणेच योग्य असते. त्यांची गोपनीयता अबाधित राखणे कर्तव्य असते. संदीप पाटील यांच्या उत्तराने कुणाचेच समाधान झाले नाही.
रोहित शर्माच्या भारतीय संघातील स्थानाबाबतही विचारले असता पाटील म्हणाले, त्याला संपूर्ण मालिका खेळायला मिळालीच नाही, त्यामुळे त्याला संधी मिळणे क्रमप्राप्त होते. शिवाय वेस्ट इंडीज दौऱ्यावर उत्तम कामगिरी करणाऱ्या संघात फारसे बदल करणे गरजेचेही नव्हते, असे त्यांनी सांगितले.

नव्या निवड समितीच्या निवडीविषयी बीसीसीआयने पाठविलेल्या नियम आणि अटींमध्ये ६० वर्षे वयाची अट आहे. यावर अजय शिर्के म्हणाले, ‘सध्याचे ट्वेन्टी-२० क्रिकेटचे युग आहे. ६० वय ओलांडलेले बहुतेक क्रिकेटपटू या क्रिकेटशी जवळीक साधून नाहीत, परिचित नाहीत. त्यामुळे संघ निवडीच्या वेळी ही समस्या उद्भवू शकते.’
पुढे स्लाईडद्वारे पाहा, संदीप पाटील यांच्या कारकिर्दीत भारतीय संघात काय काय घडले?...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...