दुबई - वर्ष 2016 मध्ये आयसीसी वुमन टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे. यासाठी 28 नाव्हेंबर ते 5 डिसेंबरदरम्यान क्वालिफाइंग टूर्नामेंट या पात्रता फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये पहिल्यांदाच महिला पंच दिसणार आहेत. यापूर्वी आयसीसीच्या कुठल्याच महिला क्रिकेट स्पर्धेत महिला पंच नव्हती. पुरुषच पंच असत.
काय म्हटले आयसीसीने ?
क्वालिफाइंग टूर्नामेंटसाठी चार महिलांची पंच म्हणून नियुक्ती केली आहे. यामध्ये न्यूजीलंडची अनुभवी खेळाडू कॅथलीन क्रॉस, ऑस्ट्रेलियाच्या क्लेयरे पोलोसाक, इंग्लंडची स्यू रेडफर्न आणि वेस्ट इंडीजची जैक्लीन विलियिम्स यांचा समावेश आहे. त्या या स्पर्धेमध्ये आता अंपायरिंग करणार आहेत, अशी माहिती आयसीसीने दिली. या चार महिला पंचाशिवाय पुरुष पंचांमध्ये अॅलन हैगो आणि निजेल मॉरिसन हेसुद्धा मैदानावर अंपायर म्हणून राहणार असून, ग्रीम लॅब्रूई मॅच रेफरी असतील.
या संघात रंगणार सामना
- क्वालिफाइंग टूर्नामेंटमध्ये आठ संघ सहभागी आहेत. यात बांग्लादेश, चीन, आयरलंड, नेदरलंड, पापुआ न्यू गिनी, स्कॉटलंड, थाईलंड आणि झिम्बाब्वेचे संघ भाग घेणार आहेत.
- इंग्लंडचे माजी कर्णधार आणि आयसीसी महिला समितीचे अध्यक्ष क्लेरे कॉनर म्हणाल्या, "थाईलंडमध्ये वुमन टी-20 वर्ल्ड कप क्वालिफाइंग टूर्नामेंटसाठी चार महिला पंचाची नियुक्ती म्हणजे सकारात्मक बदल आहे.
- महिला क्रिकेट टी-20 वर्ल्ड कप 2016 मध्ये होणार असून, त्याची तारीखही निश्चित झाली आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, टूर्नामेंटसाठी नियुक्त केलेल्या महिला पंचाचे फोटोज...