नवी दिल्ली - अगोदर मॅच फिक्सिंगच्या इतिहासात बदनामी झालेला एखादा संघ जर चांगली फलंदाजी करताना अचानक मधल्या 10 षटकांमध्येच 5 गडी गमावून बसला आणि त्यापैकी तिघे धावचित झालेले असतील तर त्या संघाकडे पुन्हा संशयाच्या दृष्टीने पाहिले जाईल, असेच पाकिस्तान संघाबाबत झाले आहे. सध्या हा संघ यूएईमध्ये इंग्लड विरुद्ध खेळत आहे. पाकिस्तान संघाने नुकतीच कसोटी मालिका जिंकली. पण, तिसऱ्या एकदिवशी सामन्यात पाकिस्तानचे बॅट्समॅनचे ज्या पद्धतीने आउट झाले ते म्हणजे शंकेला वाट करून देणे आहे.
काय झाले मॅचमध्ये ?
> ही मॅच 17 नाव्हेंबरला शारजाहमध्ये खेळली गेली.
> 49.5 षटकांत पाकिस्तान संघ 208 वर ऑलआउट झाला.
> इंग्लडच्या संघाने 41 षटकातच 210 धावा करून हा सामाना जिंकला.
> सीरीजमध्ये इंग्लड आता 2-1 ने पुढे आहे.
10 षटकांत बाद झाले 5 फलंदाज
नाणेफेक जिंकल्यानंतर पाकिस्तानच्या फलंदाजी केली. सुरुवात चांगली झाल्याने पाकिस्तान मोठी धाव संख्या उभी करेल, असे वाटत होते. परंतु, पुढे 10 षटकांच्या आतच पाकिस्तानचे पाच फलंदाज बाद झाले. दरम्यान, पाकिस्ताने कशी तरी 208 धावांपर्यंत मजल मारली. इंग्लडने अवघ्या चार व्हिकेटच्या बदल्यात विजय मिळवला.
यामुळे संशय...
> 29.3 षटकांत पाकिस्तानचे 132 धावांवर 2 फलंदाज बाद झालेले होते.
> 39.3 षटकापर्यंत पाकिस्तानचे 7 गडी बाद झाले होते.
> पाकिस्तानचे तीन फलंदाज रन आउट झाले.
> इंग्लडचे माजी कर्णधार माइकल वॉन यांनी ट्वीट करून म्हटले, असे वाटते की ते आम्हाला मुर्ख समजत आहेत. 3 रन आउट आणि असे काही शॉट्स पहिल्यांदा कधी पाहिले नाहीत.
> पाकिस्तानच्या या प्रदर्शानामुळे अनेक माजी खेळाडू नाराज झालेत. एवढेच नाही तर याला प्रशिक्षक वकार यूनिस हेच जबाबदार आहेत, असेही ते मानत आहेत.
> जावेद मियांदाद यांनी म्हटले, वकार यूनिस टीमच्या खेळाडूंमध्ये पक्षीपात करत आहेत.
> सरफराज नवाज म्हटले, जेव्हा वर्ष 2010 मध्ये इंग्लडमध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंना स्पॉट फिक्सिंगमध्ये ताब्यात घेतले गेले तेव्हाही वकार यूनिस हेच टीमचे कोच होते.
> इंग्लडचे कर्णधार माइकल वॉन यांनी आपल्या ट्वीट्सला नंतर डिलीट केले. पण, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. त्यामुळे पाकिस्तान संघावर संशय वाढला.
फिक्सिंग नाहीच : इंजमाम
पाक क्रिकेट सुपरस्टार इंजमाम उल हक म्हणाला, क्रिकेटमध्ये कधी काय होईल, हे सांगता येणार नाही. त्यामुळे संशय घेणे उचित ठरणार नाही. तो म्हणाले, काही जण पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्यावर संशय घेत आहेत. परंतु, नंतर गोलंदाजांनी खूप वाईट प्रदर्शन केले. त्यांच्यावर का संशय घेतला जात नाही ? त्यामुळे संशय घेऊ नये, असे त्याने म्हटले.