आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marriage Anniversary: Captain Of The India M.S. Dhoni And Sakshi Rawat Wedding Photos

Wedding Photos: जेव्हा धोनीने 5 स्टार हॉटेलमध्ये पहिल्यांदा पाहिले साक्षीला...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महेंद्र सिंह धोनी आणि साक्षीच्या लग्नाचे फोटोज
टीम इंडियाचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी आणि साक्षी यांनी 4 जुलै रोजी 5 वा लग्नाचा वाढदिवस साजरा केला. खरे तर धोनी आणि साक्षी यांच्या लग्नापर्यंतचा प्रवास एखाद्या बॉलीवूडच्या सिनेमापेक्षा कमी नाही. कोट्यवधी फॅन्सच्या ह्रदयावर राज्य करणारा एमएस धोनी जेव्हा कोलकत्यात पहिल्यांदा साक्षीला भेटला, तेव्हा पहिल्याच भेटीत तो साक्षीच्या प्रेमात पडला होता. या प्रेमाच रुपांतर लग्नात केव्हा झाल ते कळलेच नाही.

पहिल्‍याच भेटीत भाळली होती साक्षी
टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्र सिंह धोनीची लव्ह स्टोरी फारच गमतीदार आहे. महेंद्र सिंह धोनी आणि साक्षीची पहिली भेट कोलकत्याच्या एका फाईव स्टार हॉटेलमध्ये झाली. तेथे धोनी, भारत आणि पाकिस्तान दरम्यान होणाऱ्या टेस्ट मॅचमध्ये भाग घेण्यासाठी गेला होता. त्यावेळी साक्षी रावत हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स पूर्ण करून तेथे इंटर्नशिप करत होती. भारतीय खेळाडू तेव्हा याच हॉटेलमध्ये थांबले होते. याच मालिकेच्या दरम्यान धोनीच्या मॅनेजरने धोनीची ओळख साक्षीसोबत करून दिली आणि धोनी पहिल्याच भेटीत साक्षीच्या प्रेमात पडला.

चट 'मंगनी' पट 'ब्याह'
या भेटीच्या वेळीच दोघांनीही एकमेकांचे फोन नंबर्स घेतले आणि गप्पागोष्टींना सुरुवात झाली. याच काळात धोनीचे एका बॉलीवूडच्या अभिनेत्रीबरोबरही संबंध असल्याची चर्चा सुरू होती. मात्र त्याचा धोनीच्या लव्ह स्टोरीवर काहीच परिणाम झाला नाही. 4 जुलै 2010 ला देहराडूनजवळ असलेल्या एका रिसॉर्टमध्ये त्यांचे लग्न झाले. लग्नाच्या एक दिवस आधीच त्यांचा साखरपुडा झाला होता.

बालपणीचे मित्र
धोनी आणि साक्षी हे बालपणीचेच मित्र आहेत. ते रांचीच्या डीएव्ही श्यामली शाळेत सोबतच शिकत होते. दोघांचे वडीलही एकाच कंपनीत काम करत. साक्षीचे कुटूंब तिच्या वडीलांच्या रिटायरमेंटनंतर देहराडूनला शिफ्ट झाले. तर धोनीचे कुटूंब रांचीमध्येच स्थाईक झाले. मात्र जेव्हा धोनी आणि साक्षीची हॉटेलमध्ये भेट झाली, तेव्हा धोनी तिला ओळखू शकला नव्हता.
सुप्रसिद्ध व्यक्ती झाले होते लग्नात सामील
धोनी आणि साक्षीच्या गूपचूप झालेल्या लग्नाला स्पिनर हरभजन सिंह, आशीष नेहरा, रूद्र प्रताप सिंह, सुरेश रैना आणि रोहित शर्मा शिवाय बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शशांक मनोहर आणि बीसीसीआयचे तत्कालीन अध्यक्ष एन. श्रीनिवासन देखील उपस्थित होते.

पुढीत स्लाइडवर पाहा, महेंद्र सिंह धोनी आणि साक्षीच्या लग्नाचे काही निवडक फोटोज.