आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीनिवासन यांनी डावललेल्या केंद्रांना सामने केले बहाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बीसीसीआयच्या माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्या हुकूमशाहीविरुद्ध लढाईनंतर झालेल्या तहाचा प्रथम लाभ कानपूर, इंदूर, राजकोट, नागपूर, कोलकाता, दिल्ली या केंद्रांना झाला आहे. येत्या सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीत भारताच्या दौ-यावर येणा-या दक्षिण आफ्रिका संघाविरुद्धच्या सामन्यांचे वाटप श्रीनिवासन यांच्या राजवटीत डावललेल्या केंद्रांना करण्यात आले आहे. ४ कसोटी, ५ एकदिवसीय सामने आणि ३ ट्वेंटी-२० सामन्यांचे वाटप चेन्नईसह देशातील १२ केंद्रांना करण्यात आले आहे. कसोटी सामने मोहाली, बंगळुरू, नागपूर आणि दिल्ली येथे होतील. एकदिवसीय सामन्यांचे आयोजन कानपूर, इंदूर, राजकोट, चेन्नई, मुंबई येथे होईल. दिल्ली, धरमशाला, कटक येथे ट्वेंटी-२० सामने आयोजित करण्यात येतील. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि द. आफ्रिका मंडळाने साेमवारी संयुक्तपणे कार्यक्रमाची घोषणा केली.

डिव्हिलर्सची १०० वी कसोटी
द. आफ्रिका मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी लोगर्ट म्हणाले, दुसरी कसोटी बंगळुरूला होईल. हा एल्बी डिव्हिलर्सचा १०० वा कसोटी सामना असेल. डिव्हिलर्स आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळरू संघाकडून खेळतो. यामुळे त्याच्यासाठी हा सामना संस्मरणीय ठरेल.

द.आफ्रिका-भारत मालिकेचा कार्यक्रम
दिनांक सामना ठिकाण
२ ऑक्टोबर ट्वेंटी-२० दिल्ली
५ ऑक्टोबर ट्वेंटी-२० धरमशाला
८ ऑक्टोबर ट्वेंटी-२० कटक
११ ऑक्टोबर पहिला एकदिवसीय सामना कानपूर
१४ ऑक्टोबर दुसरा एकदिवसीय सामना इंदूर
१८ ऑक्टोबर तिसरा एकदिवसीय सामना राजकोट
२२ ऑक्टोबर चौथा एकदिवसीय सामना चेन्नई
२५ ऑक्टोबर पाचवा एकदिवसीय सामना मुंबई
५ ते ९ नोव्हेंबर पहिली कसोटी मोहाली
१४-१८ नोव्हेंबर दुसरी कसोटी बंगळुरू
२५-२९ नोव्हेंबर तिसरी कसोटी नागपूर
३-७ डिसेंबर चौथी कसोटी दिल्ली