आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिलिंद सोमण बनला "आयर्नमॅन'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
झुरिच- भारताचा सुपर मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमण आपल्या जबरदस्त बॉडी आणि फिटनेससाठी प्रसिद्ध आहे. त्याने झुरिचमध्ये झालेली ट्रायथलॉन शर्यत १५ तास १९ मिनिटे आणि २९ सेकंदांत पूर्ण करून "आयर्नमॅन ट्रॉफी' जिंकली. नोव्हेंबरमध्ये ५० वर्षांचा होणाऱ्या मिलिंदने वयाच्या महत्त्वपूर्ण टप्प्यात झुरिचमध्ये झालेली आव्हानात्मक शर्यत पार पाडली. या शर्यतीचे आयोजन विश्व ट्रायथलाॅन समितीने केले होते. शर्यतीत जलतरण, सायकलिंग आणि ४२.२० किमी धावण्याचा समावेश आहे. ही स्पर्धा १६ तासांत पूर्ण करणाऱ्या सर्व स्पर्धकांना "आयर्नमॅन' पुरस्कार देण्यात आला.

पहिल्यांदा या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या मिलिंदसह सात भारतीय सदस्यांचा संघ होता. सुपरमॉडेल मिलिंदने ट्विटर अाणि फेसबुकवर आपल्या स्पर्धेची छायाचित्रे आणि शर्यतीचा अनुभव जाहीर केला. आपला आर्शीवाद आणि प्रेमामुळे शक्य झाले, असे मिलिंदने म्हटले.