आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mitchell Johnson Says The Time Is Right To Say Goodbye

ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर मिशेल जॉनसन आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटमधून निवृत्‍त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडनी - ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज मिशेल जॉनसन याने सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्‍याची घोषणा केली. आज (मंगळवार) न्यूजीलँडविरुद्ध होत असलेली दुसरी कसोटी त्‍याचा शेवटचा आंतरराष्‍ट्रीय सामना असणार आहे.
काय म्‍हटले जॉनसनने ?
> 34 वर्षीय जॉनसनने एका प्रसिद्धी पत्रकात म्‍हटले, '' मला वाटत आहे की, निरोप घेण्‍याची ही योग्‍य वेळ आहे. माझे करिअर खूप चांगले राहिले. त्‍यामुळे मी भाग्‍यवान आहे. देशासाठी खेळताना मी प्रत्‍येक क्षण जगलो आहे. मात्र, आता थांबण्‍याची वेळ आली आहे. हे करण्‍यासाठी मी वाका (पर्थ चे क्रिकेट ग्राउंड) निवडले आहे; कारण हे मैदान माझ्यासाठी खूप खास आहे. मी खूप विचार करून हा निर्णय घेतला.''
यापूर्वीच दिले होते निवृत्‍तीचे संकेत
जॉनसन याने ऑक्‍टोबरमध्‍ये foxsports.com.au साठी लिहिलेल्‍या कॉलममध्‍ये निवृत्‍तीचे संकेत दिले होते. इंग्‍लडमधील एशेजमध्‍ये झालेल्‍या पराभवानंतर आपण निवृत्‍तीचा विचार करत असल्‍याचे त्‍याने यात म्‍हटले होते. त्‍याने लिहिले होते, ''जेव्‍हा मी पर्थला परत आलो आणि टीव्‍हीवर माटाडोर चषकाचा खेळ पाहात होते तेव्‍हा दिसले की, अनेक नवोदित मुलं खूप चांगले खेळत आहेत. त्‍यानंतर मी कुठे आहे याची जाणीव झाली. ''
जॉनसनचे रिकॉर्ड
जॉनसन हा ऑस्ट्रेलियाच्‍या यशस्‍वी गोलंदाजापैकी एक आहे. व्‍ह‍िकेट घेण्‍यात त्‍याच्‍या पुढे केवळ शेन वॉर्न (708), ग्लेन मॅकग्राथ (563) आणि डेनिस लिली (355) हे तिघेच आहेत. आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर सर्वाधिक टेस्ट व्‍ह‍िकेट घेण्‍यात तो 25 व्‍या क्रमांकावर आहे. जॉनसनने आतापर्यंत 73 टेस्ट मॅच खेळले असून, यात एकूण 311 व्‍ह‍िकेट घेतले आहेत. 153 वनडेमध्‍ये जॉनसनने 239 व्‍ह‍िकेट घेतले आहेत. त्‍याच्‍या गतीमुळे फलंदाजांच्‍या काळजात धडकी भरत असे.