17 नोव्हेंबर रोजी मिशेल जॉन्सनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर जगभरातील तमाम फलंदाजांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असेल. जॉन्सन
आपल्या काळातील सर्वात खतरनाक गोलंदाज राहिला. त्याने कसोटीमध्ये 311 आणि वनडेत 239 विकेट घेतल्या आहेत. मात्र, हे तर आकडे आहेत. या व्यक्तिमत्वाची दुसरी बाजू अशी आहे की त्याने आपल्या वेगवान गोलंदाजीमुळे दोन वेळा ग्रॅमी स्मिथ आणि एक वेळा जॅक कॅलिसचे मनगट मोडले. आयुष्यातील सुरुवातीच्या 17 वर्षांपर्यत त्याचे विम्बल्डन टेनिस खेळण्याचे मोठे स्वप्न होते, हे विशेष. पुढे तो क्रिकेटकडे वळला.
पदार्पणात सचिन, द्रविडची विकेट
जॉन्सनने 16 सप्टेंबर 2006 मध्ये भारताविरुद्ध पदार्पण केले. त्याने आपल्या पहिल्याच सामन्यात चार षटकांची गोलंदाजी केली. यात त्याने सचिन तेंडूलकर, राहुल द्रविड, युवराज सिंह आणि इरफान पठाणला तंबूत पाठवण्याचा पराक्रम गाजवला होता.
पुढे वाचा, कुणी हेरले जॉन्सनसारख्या हि-याला... अन् कोण म्हणाले, असं टॅलेंट सहज मिळत नाही...