आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१६ वर्षांनंतर बीसीसीअायच्या कार्यक्रमात अझर हाेणार सहभागी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कानपूर - येत्या गुरुवारपासून भारत अाणि न्यूझीलंड यांच्यातील सलामीच्या कसाेटीला सुरुवात हाेईल. टीम इंडियाच्या या ५०० व्या कसाेटीनिमित्ताने खास कार्यक्रमाचे अायाेजन करण्यात अाले. या साेहळ्यासाठी माजी क्रिकेटपटू माेहंमद अझरुद्दीनला निमंत्रित करण्यात अाले. त्यामुळे तब्बल १६ वर्षांनंतर अझहर अाता बीसीसीअायच्या कार्यक्रमात सहभागी हाेणार अाहे. मॅच फिक्सिंग प्रकरणामुळे बीसीसीअायने २००० मध्ये अझहरवर अाजीवन बंदीची कारवाई केली. भारताने अातापर्यंत ४९९ कसाेटी खेळल्या अाहेत. यात भारताच्या नावे १२९ विजय, १५७ पराभवाची नाेंद अाहे. यातील ४७ कसाेटीत अझरुद्दीनने टीम इंडियाचे नेतृत्व केले.

अाता साेहळ्याला अनेक दिग्गज अाणि माजी क्रिकेटपटूंना निमंत्रित करण्यात अाले.
बातम्या आणखी आहेत...