आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1 कोटीची \'हमर\', लाखांच्या बाइक्स, हे आहे धोनीचे लग्जरी कार-बाइक कलेक्शन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय वनडे संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी यशस्वी नेतृत्वाशिवाय अद्याप ज्या एका गोष्टीसाठी चर्चेत राहतो, ती आहे त्याचं बाइक कलेक्शन. जगातील सर्वाधिक श्रीमंत क्रिकेटर असलेला धोनी जेवढे पैसे कमावतो तेवढेच त्याचे छंदही मोठेच आहेत. स्टार्सकडे लग्झरी कार असणे ही सामान्य गोष्ट आहे, पण बाइक्सची आवड असणारे कमीच आहेत. धोनीच्या फॅन्सना माहितच आहे की, त्याला बाइक्सची प्रचंड आवड आहे. त्याच्याजवळ एक-दोन नाही तर, तब्बल 11 हून अधिक वेगवेगळ्या प्रकारच्या बाइक्स आहेत, ज्यात कमी किमतीपासून ते जास्त किमतीपर्यंतच्या लग्झरी बाइक्सचा समावेश आहे. 2009 मध्ये तर धोनी लग्झरी कार ‘हमर एस-2’ खरेदी केली म्हणून चर्चेत होता. या कारची किंमत साधारणपणे 1 कोटी रुपये एवढी होती.

कार आणि बाइक्सचे अप्रतिम कलेक्शन
धोनीचे कार कलेक्शन- ‘हमर’ शिवाय धोनीकडे लग्झरी कारचे आकर्षक कलेक्शन आहे. यात Mitsubishi Outlander, टोयोटा कोरोला, स्कॉर्पियो (ओपन), पजैरो SFX, ऑडी Q7 SUV, लॅंड रोवर, GMC Sierra, Ferrari 599, मारुती स्विफ्ट, मारुती SX4 चा समावेश आहे.

धोनीचे बाइक कलेक्शन- धोनीकडे यामहाच्या अनेक मॉडेल्सशिवाय लग्झरी बाइक्सदेखील आहेत. ज्यात हॅलकेट X 132, कावासाकी, हार्ले डेविडसन, रॉयल एनफील्ड, टीवीएस अपाचे, डुकाटी 1098 आदी एकूण 11 बाइक्स आहेत. त्याचे हे बाइक्स कलेक्शन केवळ दाखवण्यासाठी नाही, तर तो त्याच्या बिझी शेड्यूलमधून वेळ मिळाला की, या गाड्यांवर फेरफटका अवश्य मारतो. त्याला बाइक्स चालवताना तर अनेकदा बघितले गेले आहे.
माहित करून घ्या धोनीच्या लाइफविषयी काही फॅक्ट्स
- 2001 ते 2003 पर्यंत धोनी TTE म्हणजे ट्रेन टिकीट एग्झामिनर होता.

- धोनी जगातील सर्वाधिक श्रीमंत क्रिकेटर आहे. क्रिकेट शिवाय त्याला फुटबॉल आणि रेसिंगमध्ये इंट्रेस्ट आहे.

- किशोर कुमारचा चाहता असलेला धोनी आजच्या सिंगर्सपैकी राहत फतेह अली खान आणि कैलाश खेरला ऐकणे पसंत करतो.

- बॉलीवुडचा जॉन अब्राहम त्याचा खास मित्र आहे. दोघेही बाइक्सचे क्रेझी आहेत.

- धोनीला कॉमेडी आणि अॅक्शन फिल्मस् पाहणे अधिक आवडते. तो 'बीग बी'चा मोठा फॅन आहे आणि 'बीग बी'च्या जवळापास सर्वच फिल्मस् पाहतो.

- अॅक्ट्रेसेसपैकी त्याला कॅटरीना अधिक आवडते.

- धोनीकडे 3 श्वान आहेत. काही श्वान त्याने दत्तकही घेतले आहेत. काही वर्षांपूर्वी त्याने एक वाघही दत्तक घेतला होता.

पुढील स्लाइड्सवर पाहा धोनीच्या लग्झरी कलेक्शनमध्ये कोण-कोणत्या कार आणि बाइक्स आहेत...