मुंबई - सर्वोच्च न्यायालयाच्या व लोढा समितीच्या शिफारशींना महत्त्व न देता बीसीसीआयने बुधवारी वार्षिक सर्वसाधारण सभेत निवड समितीमध्ये ३ ऐवजी ५ निवड समिती सदस्य निवडले. बीसीसीआयने अवघे ६ कसोटी सामने खेळणारा विकेटकीपर एमएसके प्रसादची निवड समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली. निवड समितीमध्ये ज्या चार सदस्यांना नियुक्त करण्यात आले त्यात गगन खोडा (मध्य विभाग), जतीन परांजपे (पश्चिम विभाग) यांनी एकही कसोटी खेळलेली नाही, तर देवांग गांधी (पूर्व विभाग) आणि सरणदीप सिंग (उत्तर विभाग) यांनी अनुक्रमे ४ आणि ३ कसोटी सामने खेळले. प्रसादसोबत गगन खोडासुद्धा मागच्या एक वर्षापासून निवड समितीमध्ये सदस्य होते.
कोहली, धोनी समितीच्या पुढे
>१३ कसोटी आणि ३१ वनडे नव्या निवड समितीच्या एकूण पाच सदस्यांनी खेळले आहेत.
>४५ कसोटी कोहलीच्या तर २७८ वनडे एकट्या धोनीने खेळले. निवड समितीपेक्षा कैक पटीने अधिक.
व्ही. प्रसाद ज्युनियर अध्यक्ष : माजी गोलंदाज व्यंकटेश प्रसाद ज्युनियर निवड समितीचा अध्यक्ष तर अमित शर्मा, ज्ञानेंद्र पांडे, आशिष कपूर, राकेश पारिख हे सदस्य आहेत.
शरद पवार पर्यायी संचालक : वयाची सत्तरी ओलांडलेल्या शरद पवारांना आयसीसीवर पर्यायी संचालक म्हणून नियुक्त करून बीसीसीआयने लोढा समितीच्या शिफारशींनी खुले आव्हान दिले आहे.
लोढा समितीच्या सूचनांना नाकारले
१ माजी कसोटीपटूंनाच निवड समितीमध्ये स्थान असले पाहिजे, ही लोढा समितीची सूचना नाकारताना गगन खोडा आणि जतीन परांजपे या एकही कसोटी न खेळणाऱ्यांची सीनियर निवड समितीमध्ये नियुक्ती केली आहे.
२ तीनसदस्यीय निवड समितीच्या सूचनेलाही मंडळाने मान्य केले नाही.
३ कसोटीतून निवृत्त होऊन कमीत कमी ५ वर्षे झालेली असली पाहिजेत, या सूचनेलाही फेटाळले.
महिला निवड समिती
हेमलता काला, अध्यक्ष. सदस्य : शशी गुप्ता, अंजली पेंढारकर, लोपमुद्रा बॅनर्जी, सुधा शाह.
अनुराग ठाकूर करणार प्रतिनिधित्व
बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) आणि आशियाई क्रिकेट परिषदेत (एसीसी) बीसीसीआयचे प्रतिनिधित्व करतील.
पुढच्या वर्ल्डकपची योजना : प्रसाद
टीम इंडियाला २०१९ विश्वचषकासाठी योग्य दिशेने घेऊन जाण्याचे आपले लक्ष्य असून यासाठी योजनासुद्धा तयार आहे, असे भारतीय क्रिकेट निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसादने म्हटले.
९० जणांच्या मुलाखती?
सीनियर, ज्युनियर आणि महिला संघाच्या राष्ट्रीय निवड समितीसाठी मंडळाने दोन दिवसांत ९० जणांच्या मुलाखती घेतल्या.
पुढे वाचा...
कोणाकडे किती अनुभव