आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mumbai Cricketer Hiken Shah Has Been Suspended With Immediate Effect

मुंबईच्या हिकेन शहावर स्पॉट फिक्सिंगचा ठपका, BCCI ने केले निलंबित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंगप्रकरणी मुंबई रणजी संघातील क्रिकेटपटू हिकेश शहा याला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) तडकाफडकी निलंबित केले आहे. राजस्थान रॉयल्सचा क्रिकेटपटू प्रवीण तांबे याला स्पॉट फिक्सिंगची ऑफर देण्‍याचा तसेच बीसीसीआयच्या भ्रष्टाचारिविरोधी नियमांचे उल्लंघन केल्याचा हिकेनवर आरोप आहे.

नुकत्याच झालेल्या 'आयपीएल 2015'मध्ये हिकेन याने प्रवीण तांबे स्पॉट फिक्सिंगची ऑफर दिली होती. प्रवीण तांबे याने बीसीसीआयला पत्र लिहून हा सगळा प्रकार सांगितला. तांबेच्या तक्रारीची गंभीर दखल घेत बीसीसीआय आणि आयसीसीच्या एंटी करप्शन युनिटने चौकशी केली. प्राथमिक चौकशीत हिकेन शहा दोषी आढळला आहे. त्यामुळे बीसीसीआयने हिकेनला तडकाफडकी निलंबित केले आहे.

बीसीसीआय उद्या, मंगळवारी पत्रकार परिषद घेणार असून हिकेनला निलंबित केल्याची अधिकृत माहिती देणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. आयपीएल-2015 दरम्यान हिकेन याने तांबेला स्पॉट फिक्सिंगची ऑफर दिल्याचे बीसीसीआयने म्हटले आहे.

एप्रिल महिन्यात झाला होता खुलासा...
आयपीएलच्या आठव्या पर्वावरही 'मॅच फिक्सिंग' सावट असल्याचे वृत्त एप्रिल महिन्यात एका इंग्रजी वृत्तपत्राने प्रसिद्ध केले होते. राजस्थान रॉयल्सच्या (RR) एका क्रिकेटपटूने त्याला 'मॅच फिक्सिंग'ची ऑफर मिळाल्याची धक्कादायक माहिती बीसीसीआयच्या एंटी करप्शन यूनिटने दिली होती.

मुंबईच्या रणजी संघात खेळणार्‍या एका सहकार्‍याने निश्चित पॅटर्ननुसार खेळलो तर त्या बदल्यात तो आपल्याला बक्कळ पैसा देईल, असा गोप्यस्फोट राजस्थान रॉयल्सचा क्रिकेटपटू प्रवीण तांबे याने केला होता.

हिकेनचा क्रिकेट रेकॉर्ड
फॉर्मेटसामनाधावाशतकअर्धशतकविकेट
फर्स्ट क्लास372160681
लिस्ट ए67500-
टी206162012

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, कोण आहे हिकेन शहा...