आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एकदिवसीय सामन्यात अवघ्या 2 धावांमध्ये टीम ऑलआऊट, 9 खेळाडू शून्यावर बाद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - एखादी क्रिकेट टीम अवघ्या 2 धावांवर ऑलआऊट होऊ शकते? तर तुम्ही म्हणाल नाही. पण शुक्रवारी असे झाले. आंध्रप्रदेशच्या गुंटूरमध्ये बीसीसीआयच्या अंडर 19 वुमन लीग आणि नॉकआऊट टूर्नामेंटमध्ये केवळ केरळ विरूद्ध नागालँडच्या टीमने फक्त 2 धावा करता आल्या. यापैकी एक धावा अतिरिक्त मिळालेल्या आहेत. सामन्यात एकूण 17 षटक टाकण्यात आले. टीमची धावांची सरासरी 0.12 एवढी राहिली.

 

केरळची धमाकेदार बॉलिंग

- केरळ टीमचा कॅप्टन मिन्नु मणीने धमाकेदार बॉलिंग करत चार विकेट पटकावल्या. मिन्नुने चार षटक टाकल्या. या बॉलिंगमुळे नागालँडच्या केवळ एका फलंदाजाला खाते उघडता आले. ओपनर मेनकाने सर्वाधिक 18 चेंडू खेळले. तिने एक धाव घेतली. दुसरी धावा अतिरिक्त मिळाली.

 

ज्या बॉलरने दिली धाव, त्याला विकेट नाही
- केरळची गोलंदाज सुरेंद्रनने एक धावा दिली. मात्र तिला एकही विकेट घेता आली नाही. तिने 3 ओव्हरमध्ये 2 मेडनसह 2 धावा दिल्या. 
-सौरभ्या पीने 6 मेडन ओव्हरसह 2 विकेट घेतल्या. दोन बॉलर्सला 1-1 विकेट मिळाल्या. दुसरीकडे दोन खेळाडू आऊट झाले.

 

एक बॉलमध्ये सामना जिंकला

- जिंकण्यासाठी 3 धावांचा पाठलाग करतांना केरळने अवघ्या एका चेंडूत सामना जिंकला. नागालँडची बॉलर दीपिकाने पहिला चेंडू वाईड टाकला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर नागालँडच्या फलंदाजाने चौकार लगावत सामना जिंकला.

 

पुढील स्लाईडवर पाहा - सामन्याचा स्कोअरकार्ड...

बातम्या आणखी आहेत...