आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मजूर वडिलांसाठी बंगला बांधतोय हा क्रिकेटर, असे बदलले नशीब...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून तो क्रिकेटर बनला. - Divya Marathi
अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून तो क्रिकेटर बनला.
स्पोर्ट्स डेस्क - इंडियन क्रिकेटर नाथू सिंहने गुरुवारी (8 सप्टेंबर) रोजी आपला 23 वा वाढदिवस साजरा केला. नाथू सिंह अतिशय गरीब कुटुंबातून आलेल्या क्रिकेटर्सपैकी एक आहे. मात्र, एका रात्रीत त्याचे नशीब पलटले. त्याचे वडील एका वायर फॅक्ट्रीत मजूर आहेत. त्यांनी खूप संघर्ष करून नाथूला मोठे केले. नाथूला क्रिकेटर बनवण्यासाठी ते घर सुद्धा विकायला तयार झाले होते. मात्र, IPL ने त्याला कोट्याधीश बनवले असून तो आता आपल्या वडिलांसाठी बंगला उभारत आहे.
 
 
घर विकण्यासाठी तयार होते वडील
- वडिलांनी आपल्याला घडवण्यसाठी केलेला संघर्ष एका इंटरव्यूमध्ये मांडला आहे. 16 व्या वर्षी नाथूने क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली होती. तेव्हा घरातील आर्थिक परिस्थिती अतिशय वाइट होती. 
- त्यावेळी क्रिकेटसाठी महागडे शूज घेण्याचा तो विचारही करू शकत नव्हता. तरीही त्याच्या वडिलांनी व्याजाने कर्ज उचलून त्याला तब्बल 5000 रुपयांचे शूज खरेदी करून दिले होते. यानंतरही नाथूचा वाढीव खर्च भागवण्यासाठी ते कारखान्यात ओव्हरटाइम करत होते. 
- नाथूने सांगितल्याप्रमाणे, 'वडिलांना घर खर्च चालवण्यासोबतच माझा खर्च सुद्धा चालवायचा होता. ते मला म्हणाले होते, तू जे काही करत आहेस, सगळंच जीव लावून असेच करत राहा. मी तुझ्यासाठी काहीही करेन, त्यासाठी घर विकावे लागत असेल तर तेही करेन.'
 

IPL ने बदलले नशीब
- गेल्या वर्षी आयपीएलच्या लिलावात नाथूचा बेस प्राइस 10 लाख रुपये होता. मुंबई इंडिन्स टीमने त्याला तब्बल 3.2 कोटी रुपयांत विकत घेतले. अशा प्रकारे तो एका रात्रीत कोट्यधीश बनला. मागच्या सीजनमध्ये त्याला एकही मॅच खेळण्याची संधी मिळाली नाही. 
- यावर्षी गुजरात लायन्स संघाने 10 लाखांची बेस प्राइस असलेल्या नाथूला 50 लाख रुपयांत विकत घेतले. यावेळी त्याने 2 मॅच खेळले होते. यात त्याने एक विकेट घेतली आहे. 
 

वडिलांसाठी बांधतोय बंगला
- IPL मुळे एका रात्रीत कोट्यधीश क्रिकेटर झालेल्या नाथूने एका मुलाखतीमध्ये आई-वडील आणि भावासाठी एक मोठा बंगला बांधत असल्याचे सांगितले आहे. 
- जयपूरमध्ये तो जवळपास दीड कोटी रुपये खर्च करून 3 मजली आलीशान घर बांधत आहे. विशेष म्हणजे, हे घर त्याच्या जुन्या घराच्या ठिकाणीच तोडून बांधले जात आहे. बांधकाम होताच, अख्खे कुटुंब याच घरात राहणार आहे.
 
पुढील स्लाइड्सवर पाहा... असा बनला क्रिकेटर, त्याच्या खासगी आयुष्यातील आणखी फोटोज
बातम्या आणखी आहेत...