आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एनसीए करणार भारतीय संघाला ‘पाॅवरफुल’, टीम इंडिया ‘पाॅवरफुल’साठी एनसीएचा कायापालट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अाैरंगाबाद - माजी विश्वविजेत्या टीम इंडियाला ‘पाॅवरफुल’ करण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने कंबर कसली अाहे. यासाठी बीसीसीअाय राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या (एनसीए) माध्यमातून विकासात्मक याेजना राबवत अाहे. अकादमी युवा व सिनियर खेळाडूंना प्रशिक्षण देणार अाहे. यासाठी क्रिकेट अाॅस्ट्रेलिया व इंग्लंड क्रिकेट अँड वेल्ससोबत बीसीसीअायने करार केला अाहे, अशी माहिती सचिव अनुराग ठाकूर यांनी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना दिली.

ठाकूर यांनी भारतीय संघाच्या कामगिरीचा दर्जा उंचवावा अाणि प्रतिभावंत युवा खेळाडू घडवण्याच्या दृष्टीने एक माेहीम हाती घेतली अाहे. त्यांच्या दूरदृष्टिकाेनातून एनसीएमध्ये टीम इंडियासाठी प्रतिभावंत खेळाडू घडवण्यात येणार अाहे. यासाठी या अकादमीमध्ये अनुभवी विदेशी प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार अाहे. तसेच भारताच्या माजी खेळाडूंचेही मार्गदर्शन युवा खेळाडूंना मिळणार अाहे. या कार्याच्या प्रस्तावाला बीसीसीअायने मान्यतादेखील दिली अाहे. त्यामुळे एनसीएच्या नव्या बदलाचा मार्ग माेकळा झाला.

एनसीएला मिळणार नवसंजीवनी!
मागील दाेन वर्षांपासून राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या अनेक याेजना व माेहिमा थंड बस्त्यात पडल्या अाहेत. त्यामुळे एनसीए मृत स्वरूपाकडे वाटचाल करत हाेती. मात्र, या एनसीएला पुन्हा एकदा नव्याने चालना मिळणार अाहे. त्यासाठी बीसीसीअायचे नवनियुक्त सचिव अनुराग ठाकूर यांनी अापल्या कल्पनेतून एनसीएला नवसंजीवनी दिली अाहे. यासाठीच तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या माध्यमातून युवांच्या टॅलेंटचा विकास केला जाईल.

पाच झाेनमधील प्रतिभावंतांना संधी
एनसीएच्या नव्याने तयार केलेल्या विकासात्मक याेजनेमध्ये युवा अाणि प्रतिभावंत खेळाडूंना संधी मिळणार अाहे. त्यासाठी बीसीसीअायच्या पाच झाेनमधून खेळाडूंची निवड केली जाईल. यातील प्रत्येक झाेनमध्ये पाच ते सहा राज्यांचा समावेश अाहे.

लवकर शुभारंभ
बीसीसीअाय अाॅफ सीझनमध्ये (जून-जुलै) अकादमीची माेहीम राबवली जाणार अाहे. यासाठी विदेशी व स्थानिक काेच व अनुभवी माजी खेळाडूही सहभागी होणार अाहेत. हे सर्व एनसीएमध्ये खेळाडूंना प्रशिक्षण देणार अाहेत.

वयाेगट
१६ वर्षे
१९ वर्षे
२३ वर्षे
सीनियर (सर्व वयाेगटात साधारण १०० पेक्षा अधिक खेळाडू)

फायदा असा
>विदेशी प्रशिक्षकांच्या माध्यमातून खेळाडूंना तंत्रशुद्ध प्रशिक्षण.
>माजी खेळाडूंच्या अनुभवाचा मिळणार फायदा.
>युवा खेळाडूंना सीनियर क्रिकेटपटूंसाेबत खेळण्याची संधी
>एकाच छताखाली अत्याधुनिक तंत्रज्ञानांच्या मदतीने प्रशिक्षण.