आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IND vs NZ: 900 व्या वनडेत भारताने मिळवला 455 वा विजय; कोहली, हार्दिक चमकले !

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धर्मशाला - कसाेटी मालिकेतील द्विशतकाचा फाॅर्म कायम ठेवताना विराट काेहलीने (८५) नाबाद अर्धशतकाच्या बळावर रविवारी टीम इंडियाला विजय मिळवून दिला. यजमान भारताने रविवारी करिअरमधील ९०० व्या वनडेत ४५५ वा विजय मिळवला. यजमानांनी सलामीला न्यूझीलंडवर ६ गड्यांनी मात केली. यासह भारताने पाच वनडे सामन्यांच्या मालिकेत १-० ने अाघाडी घेतली. मालिकेतील दुसरा वनडे येत्या गुरुवारी दिल्लीमध्ये रंगणार अाहे. पदार्पणात युवा गाेलंदाज हार्दिक पांड्याने धारदार गाेलंदाजी करताना शानदार तीन विकेट घेतल्या.
न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना ४३.५ षटकांत १९० धावांची खेळी केली. प्रत्यु्त्तरात टीम इंडियाने अवघ्या ३३.१ षटकांत ४ गड्यांच्या माेबदल्यात लक्ष्य गाठले. यजमानांच्या विजयात सलामीवीर अजिंक्य रहाणे (३३), महेंद्र सिंग धाेनी (२१), मनीष पांडे (१७) यांनी माेलाचे याेगदान दिले. त्यामुळे भारताने विजयश्री खेचून अाणली.

धावांचा पाठलाग करणाऱ्या भारतीय संघाला सलामीवीर राेहित शर्मा (१४) अाणि अजिंक्य रहाणे (३३) यांनी दमदार सुरुवात करून दिली. या जाेडीने टीमला ४९ धावांच्या भागीदारीची सलामी दिली. दरम्यान, ब्रेसवेलने ही जाेडी फाेडली. त्याने राेहित शर्माला पायचीत करून टीम इंडियाला पहिला जबर धक्का दिला. त्यापाठाेपाठ रहाणेही तंबूत परतला. त्याने ३४ चेंडूंत चार चाैकार व दाेन षटकारांच्या अाधारे ३३ धावांची खेळी केली. त्याला निशामने झेलबाद केले. विराट काेहलीने नाबाद अर्धशतक ठाेकून विजयश्री खेचून अाणली.

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून भारताने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. कर्णधार धाेनीचा हा निर्णय हार्दिक अाणि उमेश यादवने याेग्य ठरवला. त्यांनी अनुक्रमे मार्टिन गुप्तिल (१२) अाणि विल्यम्सनला (३) बाद केले.

काेहलीची विराट फलंदाजी
काेहलीने ८१ चेंडूंत शानदार ८५ धावा काढल्या. यात ९ चाैकार अाणि एका षटकारांचा समावेश अाहे. याशिवाय त्याने वनडे करिअरमध्ये ३७ वे अर्धशतक अापल्या नावे केले. याशिवाय त्याने धाेनीसाेबत ६० धावांची भागीदारी रचली. त्यानंतर त्याने केदार जाधवसाेबत (नाबाद १०) अभेद्य ३२ धावांची भागीदारी केली.

भारताचा ४५५ वा विजय
टीम इंडियाने अापल्या ४३ वर्षांच्या वनडे करिअरमधील विक्रमी ९०० वा सामना जिंकला. यासह भारताने यात ४५५ व्या विजयाची नाेंद अापल्या नावे केली. भारताने रविवारी न्यूझीलंडवर मात केली. अशा प्रकारे ९०० वनडे खेळणार भारत हा जगातील पहिला संघ ठरला. यात भारताने ४५५ विजय मिळवले. भारताने ३९९ सामने गमावले, १ सामना टाय अाणि ३९ सामने अनिर्णीत राहिले. भारताने १३ जुलै १९७४ मध्ये पहिला वनडे इंग्लंडविरुद्ध खेळला हाेता.

सामनावीर हार्दिकची धारदार गाेलंदाजी
हार्दिक पांड्या, केदार जाधव, अमित मिश्रा व उमेश यादवने धारदार गाेलंदाजी केेली. हार्दिकने ७ षटकांत ३१ धावा देत ३ विकेट घेतल्या. मिश्राने ३ बळी घेतले. यादव व केदार जाधवने प्रत्येकी दाेन गडी बाद केले.
पुढील स्लाइड्‍समध्ये फोटोतून पाहा, भारतविरुद्ध न्युझीलंड सलामीच्या सामन्याची रंगत...
बातम्या आणखी आहेत...