आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मानवी तस्करीचा आरोपी मार्टिन बडाेद्याचा काेच, २००९ मध्ये झाली होती अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - एकीकडे सर्वाेच्च न्यायालय भारतीय क्रिकेटला स्वच्छ करण्याचा प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे बडोद्या क्रिकेट संघटनेने (बीसीए) मानवी तस्करीकरणाच्या आरोपाखाली जेलची हवा खात असलेल्या जेकब मार्टिनला रणजी संघाचा प्रशिक्षक केेले आहे. ही नियुक्ती लोढा समितीने सूचनेच्या विरुद्ध असल्याचे काही वरिष्ठ खेळाडू आणि पदाधिकाऱ्यांनी म्हटले. मार्टिन भारताकडून १० आंतरराष्ट्रीय वनडे सामने खेळला आहे.

मार्टिनला २००९ मध्ये दिल्लीतील इंदिरा गांधी विमानतळावर २००३ च्या मानवी तस्करीप्रकरणी अटक केली. तो निमेश नावाच्या युवकाला पैसे घेऊन इंग्लंडमध्ये क्रिकेट खेळण्यासाठी घेऊन जात होता. त्याने निमेशचा बनावट पासपोर्ट तयार केला होता. निमेश म्हणाला होता की, मार्टिनने त्याच्याकडून सात लाख रुपये घेऊन इंग्लंडला पाठवण्याचा बंदोबस्त केला होता. त्याने अज्वा नावाचा एक बनावट क्लब तयार केला. न्यायालयाने त्याचा जामीन नाकारला होता. दिल्ली पोलिसांनी मार्टिनविषयी माहिती देणाऱ्याला २५ हजार रुपये बक्षीस देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर त्याला एप्रिल २०११ मध्ये शाहदरा येथील बाबरपूर येथून अटक केली. त्याच्यावर लावण्यात आलेले आरोप अत्यंत गंभीर आहेत. तो भारतीय रेल्वेचा कर्मचारी होता. या प्रकरणानंतर रेल्वेने त्याला काढून टाकले होते. जेकब मार्टिन नुकताच जामिनावर सुटला आहे आणि त्याला लगेच प्रशिक्षक पदावर नियुक्त करण्यात आले. त्याची प्रशिक्षक म्हणून निवड करताच लोढा समितीचे सचिव गोपाल शंकर नारायण यांनी म्हटले की, कोणताही आरोप असलेली व्यक्ती प्रशिक्षक बनू शकत नाही. बीसीसीआयचे सचिव अजय शिर्के म्हणाले की, ही बाब राज्य संघटनेची असून बीसीसीआय आणि त्यांच्या सदस्यांवर त्याचा परिणाम होणार नाही.
संघातील एका वरिष्ठ खेळाडूने म्हटले की, तुम्ही तिहार कारागृहात जाऊन आलेल्या व्यक्तीची रणजी ट्रॉफीच्या प्रशिक्षकपदी कशी निवड करू शकता? ही बाब पूर्णपणे अनैतिक आहे. तो चांगला क्रिकेटपटू असला तरी कायद्याच्या दृृष्टीने ती चांगला व्यक्ती नाही. त्याची प्रशिक्षकपदी नियुक्ती करून बीसीएने चांगले उदाहरण दिले नाही. याप्रकरणी मार्टिन म्हणाला की, मला कायद्यावर पूर्ण विश्वास आहे. मी या सर्व आरोपांतून बाहेर पडेल.
बातम्या आणखी आहेत...