आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संडे सेलिब्रिटी एबी : व्हायचे होते विम्बल्डन चॅम्पियन, बनला क्रिकेट स्टार !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मैदानावर चारही बाजूंनी फटके मारण्याच्या कलेमुळे सर्व जण त्याला "मिस्टर ३६०' नावाने हाक मारतात. तो फलंदाजीसोबत क्षेत्ररक्षणातही मास्टर आहे. तो चेंडूवर इतक्या चपळतेने झेप घेतो की, चेंडू त्याच्या आजूबाजूने निघू शकत नाही..ही व्यक्ती म्हणजे द. आफ्रिकेचा कसोटी, वनडे कर्णधार ३२ वर्षी ए. बी. डिव्हिलर्स आहे. तो क्रिकेट खेळण्यात इतका परफेक्ट आहे की, त्याला देवाने फक्त या कामासाठीच बनवले की काय, असे वाटते. मुळात असे नाही. तो क्रिकेटशिवाय हॉकी, फुटबॉल, टेनिस, रग्बी, गोल्फ, जलतरण आणि बॅडमिंटनमध्येसुद्धा तरबेज आहे. आपल्या शालेय जीवनात त्याने या खेळात बरीच पदके जिंकली आहेत. इतके खेळ खेळणारा जगात दुसरा माणूस बहुधा नसावा. त्याच्या या प्रतिभेमुळे त्याला क्रीडा जगताचा "सुपरमॅन' म्हटले जाऊ शकते.
ए. बी. क्रिकेटच्या महान खेळाडूंत सामील आहे. त्याच्या नावे अनेक विक्रम आहेत. मात्र, खूप कमी लोकांना माहिती आहे की, त्याला क्रिकेट खेळायचे नव्हते. त्याचे पहिले प्रेम तर टेनिस होते. तो टेनिसच्या सर्व प्रमुख स्पर्धा बघायचा. विम्बल्डन चॅम्पियन बनण्याचे तो स्वप्न बघायचा. शिवाय टेनिसमध्ये टॉपला पोहोण्याचे त्याचे लक्ष्य होते. मात्र, तो बनला क्रिकेटचा स्टार खेळाडू. ए.बी.चे वडील डॉक्टर होते. बालपणी मलासुद्धा वडिलांप्रमाणे डॉक्टर व्हायची इच्छा होती, असे त्याने एका मुलाखतीत म्हटले. मात्र, त्याला याच्या शिक्षणाची संधी मिळाली नाही. त्याचे संपूर्ण कुटुंब खेळाशी जुळालेले आहे. कुटुंबात खेळाबद्दल अतोनात प्रेम आहे. ए.बी. लहान होता, तेव्हापासून मैदानी खेळ खेळण्यास त्याने सुरुवात केली. तो आणि त्याच्या दोन भावांचेसुद्धा खेळावर प्रेम होते. त्यांच्यात नेहमी स्पर्धा व्हायची. त्यांच्याकडे खेळण्यासाठी चेंडू नसला तर तो भावासोबत डाेंगरावर जाऊन रेस लावत असे. आपल्या समवयस्क मुलांच्या हाती रिमोट कंट्रोल कारचे खेळणे बघितले तर त्याला ईर्षा निर्माण व्हायची. यानंतर तो खेळात इतका तल्लीन व्हायचा की त्याला इतर गोष्टीसाठी वेळच पुरत नसे. ए.बी. ख्रिश्चन धर्माचा कट्टर समर्थक आहे. देवावर त्याचा विश्वास आहे. आपल्या जीवनात जे काही घडते, ते देवाच्या इच्छेने होते, असे तो म्हणतो. त्याचे सर्वाधिक आवडते पुस्तक "बायबल' आहे. ए.बी.ने जुलै २०१५ मध्ये डॅनियल स्वार्टशी लग्न केले. त्याला एक लहान मुलगा आहे. खेळाशिवाय त्याला संगीताचे चांगले ज्ञान आहे. तो रॉकस्टारसुद्धा आहे. तो गाणेसुद्धा लिहितो. सोबतच तो ड्रम, पियानो, गिटार वाजवण्यात तरबेज आहे.
पुढील स्‍लाइडवर वाचा, आयसीसी वनडे रँकिंगमध्ये अव्वल