आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BCCI मधून राजकीय नेत्‍यांची सुटी करून सट्टा अधिकृत करा, लोढा समितीची शिफारस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्‍या (बीसीसीआय) कामाकाजाचा अभ्‍यास करण्‍यासाठी नेमण्‍यात आलेल्‍या न्‍यायाधीश आर.एम. लोढा समितीने आज (सोमवार) आपला अहवाल सर्वोच्‍च न्‍यायालयाकडे सादर केला. यामध्‍ये मंडळाच्‍या व्‍यावस्‍थापनातून राजकीय नेत्‍यांची सुटी करण्‍याची शिफारस केली. शिवाय क्रिकेटमध्‍ये सट्टा अधिकृत करावा, आयपीएलमध्‍ये प्रत्‍येक राज्‍यातून एक संघ पूर्ण सदस्य असेल आणि त्‍यालाच मतदानावचा अधिकार असेल, असेही यात सूचवले.
बीसीसीआयमध्‍ये किती सदस्‍य की ज्‍यांनी कोणतीच स्‍पर्धा खेळली नाही...
- लोढा यांनी आपल्‍या समितीच्‍या अहवालात म्‍हटले, ''बीसीसीआयमध्‍ये सध्‍या एकूण 34 सदस्‍य आहेत. यातील काही असे आहेत की, ज्‍यांनी आतापर्यंत एकही स्‍पर्धा खेळली नाही.''
- ''नॅशनल क्रिकेट क्लब ऑफ कोलकाता याचे एक उदाहरण आहे.''
- ''काही असे सदस्‍य आहेत की त्‍यांचे एकापेक्षा अधिक संघ आहेत. जसे की महाराष्ट्र, गुजरात.''

नेमके काय आहे अहवालात ?


- क्रिकेटमध्‍ये सट्टेबाजीला अधिकृत मान्‍यता द्यावी
---------------------------------------
- बीसीसीआयचा कुणीही सदस्‍य मंत्री किंवा सरकारी सेवेत नोकरी करणार नसावा.
---------------------------------------
- बीसीसीआयचे पदाधिकारी सलग दोन वर्षांपेक्षा अधिक काळ आपल्‍या पदावर कायम राहू शकणार नाहीत.
---------------------------------------
- बीसीसीआयमध्‍ये एक व्यक्‍ती, एक पदाचा नियम लागू करावा.
---------------------------------------
- काम परदर्शक व्‍हावे, यासाठी मंडळाला सावर्जनिक संस्‍था किंवा कंपनी बनवण्‍याची शिफारस केली गेली आहे.
---------------------------------------
- रेल्‍वे, सेना आणि विद्यापिठांचे संघ केवळ सहकारी सदस्य असावेत.
- त्‍यांना मतदानाचा अधिकार नसावा.
---------------------------------------

का आहे हा अहवाल विशेष ?
- बीसीसीआयाच्‍या कामाचा बारकाईने अभ्‍यास करून हा अहवाल तयार करण्‍यात आला.
- हा अहवाल स्‍वीकारला तर क्रिकेट जगतातच नाही तर बोर्डमध्‍ये असलेले राजकारणी, व्‍यावसायिक यांच्‍यावर फरक पडेल.
- सर्वात मोठा बदल म्‍हणजे बोर्डाचे व्‍यवस्‍थापन माजी क्रिकेट खेळाडूंच्‍या हाती जाईल.
- म्‍हणजेच पैशाच्‍या बळावर बीसीसीआयमध्‍ये यापुढे प्रवेश मिळणार नाही.
पुढे वाचा, का स्‍थापन केली लोढा समिती?
बातम्या आणखी आहेत...