आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंधू, मरिन, सायनाचा आज पीबीएलसाठी होणार लिलाव, १ जानेवारीपासून पीबीएल; १६ ऑलिम्पियन सहभागी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - येत्या १ जानेवारीपासून यंदाच्या सत्रातील प्रीमियर बॅडमिंटन लीगला (पीबीएल) सुरुवात हाेणार आहे. या स्पर्धेसाठी बुधवारी खेळाडूंवर बाेली लावण्यात येणार आहे. दिल्लीमध्ये ही लिलाव प्रक्रीया हाेणार आहे. यामध्ये रियाे ऑलिम्पिकमधील राैप्यपदक विजेत्या सिंधुसह सायना नेहवाल, जगातील नंबर वन मरिन, डेन्मार्कचा व्हिक्टर एलेक्सनसारखे दिग्गज खेळाडू सहभागी हाेणार आहेत. या लीगमध्ये देशविदेशातील दिग्गजांनी आपला सहभाग नाेंदवला आहे. यामध्ये ऑलिम्पिक पदक विजेत्या १६ खेळाडूंचा समावेश आहे. या लीगमध्ये सहा संघात चुरस रंगणार आहे.

या लिलाव प्रक्रीयेमध्ये यंदा भारताच्या सिंधुवर सर्वांची नजर असेल. तसेच सायना नेहवाल, मरिनला माेठी रक्कम मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बातम्या आणखी आहेत...