आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीसीसीआयकडून खेळाडूंची सुटका नाहीच, बंदी कायम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आयपीएल-६ स्पॉट फिक्सिंगच्या आरोपातून क्रिकेटपटू एस. श्रीसंत, अंकित चव्हाण आणि अजित चंदिला यांना न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष सोडले. मात्र, या तिघांवर दयामाया दाखवण्याची बीसीसीआयची तयारी नाही. या तिघांविरुद्ध पुरेसे पुरावे नसल्याने ते सुटले. याचा अर्थ त्यांनी फिक्सिंग केली नाही, असा होत नाही.
तिघांवरील आजीवन बंदीची शिक्षा कायम राहील, असे बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी सांगितले. दिल्लीच्या एका न्यायालयाने आयपीएल-६ मध्ये राजस्थान रॉयल्सच्या तिन्ही खेळाडूंना स्पॉट फिक्सिंगच्या आरोपांतून मुक्त केले होते. मात्र, अनुराग ठाकूर म्हणाले, 'गुन्ह्याच्या आरोपांतून मुक्त होणे आणि पूर्णपणे निर्दाेष सिद्ध होणे, यात फरक आहे. न्यायालय कोणालाही पुराव्याशिवाय शिक्षा देऊ शकत नाही. यामुळे तिघे सुटले.' याचा अर्थ या तिघांनी बेइमानी केली नाही, असा होत नाही, असे ठाकूर म्हणाले.

अंकितचे साकडे
मुंबई | दिल्ली-पतियाळा न्यायालयाने आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणी दोषमुक्त ठरवलेला मुंबईचा क्रिकेटपटू अंकित चव्हाण याने आपली पालक संस्था मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे स्थानिक क्रिकेटमध्ये आणि क्रिकेटच्या मुख्य प्रवाहात आपल्यास खेळण्यास परवानगी द्यावी, असा विनंती अर्ज केला आहे. एमसीएचे संयुक्त सचिव पी. व्ही. शेट्टी यांनी यासंदर्भात सांगितले. कार्यकारिणी बैठकीत अंकितच्या अर्जावर निर्णय होईल.

श्रीसंतला आशा
राष्ट्रीय संघात पुनरागमनाबाबत मी आशावादी आहे. मी बीसीसीआयच्या विरोधात जाणार नाही. कारण मी जो काही आहे तो बीसीसीआयमुळेच. मात्र, मला देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमनाचा विश्वास आहे, असे श्रीसंतने म्हटले. त्याला केरळ संघटनेने पाठिंबा दिला आहे.