आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामने हलवणे दुष्काळावर तोडगा नाही - कर्णधार धोनी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - दुष्काळग्रस्त महाराष्ट्रात आयपीएल सामन्यांचे आयोजन होत असल्याने सुरू असलेल्या गोंधळात टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने उडी घेतली आहे. क्रिकेट सामने हलवणे हा दुष्काळावर तोडगा नाही. दुष्काळ निवारणासाठी दीर्घकालीन तोडगा शोधणे गरजेचे आहे, असे धोनीने म्हटले. धोनी अायपीएलमध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट्सचा कर्णधार आहे.

राज्यातील तीन शहरे मुंबई, पुणे आणि नागपुरात मिळून तब्बल २० आयपीएलचे सामने आयोजित केले जात आहेत. यातील एक सामना शनिवारी वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. सामन्यानंतर पत्रकारांनी धोनीला दुष्काळाबाबत विचारले असता तो म्हणाला, "हे क्रिकेट सामने आणखी इतरत्र आयोजित करण्याबाबत प्रश्न किंवा सूचना ऐकायला चांगल्या वाटतात. आयपीएलचा पाचवा, सहावा, सातवा सामना येथे झाल्यास अथवा न झाल्यास खूप परिणाम होईल, असे मला वाटत नाही. जेथे पाणी नाही, तेथे पाणी पाठवण्याची सोय आपणाला करावी लागेल. येथे काही धरणांत केवळ एक किंवा दोन टक्केच पाणी शिल्लक आहे. यामुळे अशा संकटावर आपणाला दीर्घकालीन समाधान, उत्तर शोधावे लागेल,' असे तो म्हणाला.