आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संघात स्थान मिळवण्याचा सध्या विचार नाही : अाेझा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई - अापल्या कामगिरीचा दर्जा उंचावण्यासाठी सध्या मेहनत घेत अाहे. त्यामुळे सध्या तरी टीम इंडियात स्थान मिळवण्याचा काेणताही विचार मी करत नाही, अशी कबुली युवा फिरकीपटू प्रज्ञान अाेझाने दिली. नुकत्याच चेन्नईत झालेल्या पहिल्या चारदिवसीय अधिकृत नसलेल्या कसाेटीत अाॅस्ट्रेलिया अ संघाविरुद्ध त्याने शानदार गाेलंदाजी केली.

युवा गाेलंदाज अाेझाने भारत अ संघाचे प्रतिनिधित्व करताना कसाेटीत एकूण ६ बळी घेतले. यात पहिल्या डावातील पाच विकेटचा समावेश अाहे. श्रीलंका दाै-यासाठी जाहीर झालेल्या कसाेटी संघात अाेझाला स्थान मिळाले नाही. तब्बल १८ महिन्यांनंतर भारताच्या अ संघाकडून खेळण्याची त्याला संधी मिळाली. याच संधीचे साेने करत त्याने शानदार गाेलंदाजी केली. यातुनच त्याने अापल्या कामगिरीचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दाखवून दिले. त्याला अाता २९ जुलैपासून सुरू हाेणा-या दुस-या चारदिवसीय कसाेटीत उल्लेखनीय कामगिरीची अाशा अाहे. दाेन दिवसांपूर्वीच अाेझा हा साधारण फिरकीपटू असल्याचे वक्तव्य सुनील गावसकर यांनी केले. त्याला अांतरराष्ट्रीय कसाेटीत दर्जेदार कामगिरी करण्याची गरज असल्याचेही या वेळी त्यांनी सांगितले.