आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL-10 सीझनचे शेड्यूल जाहीर, हैदराबादमध्ये 5 एप्रिलला पहिली लढत, 47 दिवस सामने

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) 2017 मध्ये खेळल्या जाणार्‍या इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलच्या 10 व्या सीझनचे शेड्यूल (कार्यक्रम) जाहीर केले आहे.

47 दिवस चालणार्‍या टुर्नामेंटला हैदराबादेत 5 एप्रिलला प्रारंभ होणार आहे. सनराइजर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुमध्ये पहिली तर इंदूरमध्ये 8 एप्रिलला होळकर स्टेडियमवर किंग्ज इलेवन पंजाब आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्समध्ये दुसरी लढत होईल.

प्रत्येक संघ खेळेल एकूण 14 सामने...
- देशभरातील 10 वेगवगळ्या स्टेडियमवर 47 दिवस ही टूर्नामेंट खेळली जाईल. 
- प्रत्येक संघ एकूण 14 सामने खेळेल. त्यापैकी सात सामने संघाच्या होम पीचवर होतील.

क्वालीफायर-एलिमिनेटरसाठी स्टेडियम निश्चित नाही...
- यंदाच्या सीझनचा पहिला क्वालीफायर 16 मे रोजी खेळला जाईल आहे.
- दुसरीकडे, एलिमिनेटर राउंड 17 मे रोजी होईल. त्यानंतर दुसरा क्वालीफायर 19 मे रोजी खेळला जाईल.
- क्वालीफायर आणि एलिमिनेटर सामने कोणत्या स्टेडियमवर खेळले जातील, याबाबत अद्याप घोषणा झाली नाही. 
- दरम्यान, आयपीएल-10 साठी क्रिकेटपटूंचा ऑक्शन (लिलाव) 20 फेब्रुवारीला होणार आहे.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, IPL-10 सीझनचे शेड्यूल...कोणत्या स्टेडियमवर होईल कोण-कोणत्या संघाचे सामने...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...