आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात होणार आता कसोटी लढत, बीसीसीआयचीे सहा नव्या कसोटी केंद्रांची घोषणा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बीसीसीआयच्या क्रिकेट मालिका कार्यक्रम रूपरेखा आखणाऱ्या समितीच्या आजच्या मुंबईतील बैठकीत, तब्बल १३ कसोटी सामने ८ एकदिवसीय सामने आणि ३ ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यांची घोषणा करण्यात आली. पुणे, राजकोट, विखापट्टणम, धरमशाला, रांची आणि इंदूर या नव्या कसोटी केंद्रांवर यापैकी काही कसोटी सामने होतील.

भारताच्या क्रिकेट हंगामाची सुरुवात न्यूझीलंडविरुद्ध ३ कसोटींच्या मालिकेने होईल. न्यूझीलंड संघ ५ एकदिवस क्रिकेट सामनेही खेळणार आहे. त्यानंतर इंग्लंड संघ भारतात ५ कसोटी, ३ एकदिवसीय आणि ३ ट्वेन्टी-२० सामने खेळण्यासाठी येणार आहे. २०१७ च्या फेब्रुवारी-मार्च महिन्यात ऑस्ट्रेलिया भारताच्या दौऱ्यावर ४ कसोटी सामने खेळण्यासाठी येणार आहे. त्यानंतर बांगलादेश एक कसोटी सामना खेळणार आहे.
न्यूझीलंडविरुद्ध भारताचे कसोटी सामने इंदूर, कानपूर, कोलकाता येथे होतील. धरमशाला, विशाखापट्टणम, दिल्ली, मोहाली, रांची येथे एकदिवसीय सामने होतील.
इंग्लंडविरुद्धचे ५ कसोटी सामने, मोहाली, राजकोट, मुंबई, विशाखापट्टणम, चेन्नई येथे होतील.
पुण्यात यंदा २ सामने
इंग्लंडचे वनडे पुणे, कटक, कोलकाता येथे होतील. बंगळुरू, नागपूर, कानपूर येथे टी-२० होतील. ऑस्ट्रेलियाचे ४ कसोटी सामने अनुक्रमे, बंगळुरू, धरमशाला, रांची व पुणे येथे होतील.
बातम्या आणखी आहेत...