आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1992 विश्व चषकापासून आतापर्यंत एकदिवसीय क्रिकेटमध्ये झाले हे बदल...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क - 1992 वर्ल्ड कपमध्ये प्रथमच एकदिवसीय सामना रंगीत कपड्यांमध्ये खेळण्यात आला. पांढऱ्या चेंडू, काळी साइट स्क्रीन आणि फ्लड लाइटमध्ये मॅच खेळले गेले. यापैकी काही नियम प्रचलित होते. पण या नियमांना प्रथमच वनडे मॅचमध्ये अधिकृतरीत्या लागू करण्यात आले. तेव्हापासून आतापर्यंत एकदिवसीय सामन्यांमध्ये अनेक महत्वाचे बदल घडून आले आहेत. त्याचाच आढावा घेऊया...
 

फील्डिंग प्रतिबंध
>> 1992 पर्यंत फील्डिंग प्रतिबंधांचे नियम बंधनकारक करण्यात आले. 15 षटकांमध्ये घेऱ्याच्या बाहेर केवळ दोनच फील्डर लावण्याची परवानगी देण्यात आली. 15 ओव्हरनंतरच 5 फील्डर्सला घेऱ्याच्या बाहेर फील्डिंग करण्याची परवानगी आहे. 1996 च्या वर्ल्ड कपमध्ये श्रीलंकेचे ओपनिंग बॅट्समेन सनथ जयसूर्या आणि रोमेश कालुविथरना यांनी सुरुवातीच्या 15 ओव्हरमध्ये झपाट्याने स्कोर करून ओपनिंग बॅट्समेनसाठी नव्या ट्रेंडची सुरुवात केली. 
>> 2005 मध्ये पावरप्ले सुरू झाल्यानंतर यात सुद्धा बदल करण्यात आले. सुरुवातीच्या 10 ओव्हर्ससाठी 30-यार्ड सर्कलच्या बाहेर केवळ दोन फील्डर्स ठेवण्याची परवानगी देण्यात आली. फील्डिंग करणाऱ्या टीमला दोन पावरप्ले घेणे आवश्यक होते. या दरम्यान ते कमाल 3 खेळाडू या घेऱ्याच्या बाहेर ठेवू शकत होते.
>> 2008 मध्ये नवा नियम बनवण्यात आला. त्यानुसार, बॅटिंग करणारी टीम आणि बॉलिंग करणारी टीम प्रत्येकी एक-एक पावरप्ले घेऊ शकत होते.
>> 2011 मध्ये आयसीसीने एक नवा नियम काढला आणि सर्वच पावरप्ले 41 व्या ओव्हरपूर्वी समाप्त करण्यास सांगितले. तसेच उर्वरीत ओव्हर्समध्ये केवळ 5 फील्डर घेऱ्याच्या बाहेर ठेवण्याची परवानगी दिली. 
>> 2012 मध्ये आणखी पुन्हा बदल करण्यात आले. आयसीसीने 30-यार्ड सर्कलच्या बाहेर बिगर-पावरप्ले ओव्हरमध्ये खेळाडूंची संख्या 5 वरून 4 केली. तर, पावरप्ले दरम्यानचा आकडा वाढून 2 वरून 3 करण्यात आला. 
>> 2015 मध्ये आणखी एक नवीन नियम आला. त्यानुसार, 41 ते 50 ओव्हरपर्यंत 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 5 फील्डर्स ठेवण्याची परवानगी देण्यात आली, जेणेकरून फील्डिंग करणाऱ्या टीमला फायदा होऊ शकेल. 
>> सध्या 41 ते 50 व्या ओव्हर पर्यंत 4 फील्डर घेऱ्याच्या बाहेर राहू शकतात. तसेच 1 ते 10 व्या ओव्हरपर्यंत केवळ दोनच खेळाडू सर्कलच्या बाहेर ठेवण्याची परवानगी आहे. 
 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी काही महत्वाचे नियम...
बातम्या आणखी आहेत...