आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेसलर योगेश्वरचा साखरपुडा; काँग्रेस नेत्याच्या कन्येसोबत जानेवारीत घेईल सातफेरे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोनीपत (हरियाणा)- ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक विजेता रेसलर योगेश्वर दत्तचा नुकताच साखरपुडा झाला. काँग्रेस नेते जयभगवान शर्मा यांची कन्या शीतलसोबत योगेश्वर येत्या जानेवारीत दिल्लीत सातफेर घेणार आहे.

रविवारी झालेल्या रिंग सेरेमनीमध्ये दोन्ही फॅमिलीने खास पाहुण्यांना निमंत्रित केले होते. याशिवाय अनेक राजकीय नेत्यांना या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. 16 जानेवारी 2017 रोजी‍ दिल्लीत शाही विवाह होणार आहे.

रिंग सेरेमनीला ही नेते मंडळींनी लावली हजेरी....
- रिंग सेरेमनीला माजी केंद्रीय मंत्री मुरलीमनोहर जोशी, खासदार आणि इंडियन रेसलिंग फेडरेशनचे अध्यक्ष चेअरमन ब्रजभूषण शरण, काँग्रेसचे नेते कुलदीप बिश्नोई, आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नवीन जयहिंद आणि त्यांची पती स्वाती मालीवाल (दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा) उपस्थित होत्या.

कांस्य पदक विजेता योगेश्वर
- योगेश्वर हा सलग चार वेळा ऑलिम्पिकमध्ये खेळला आहे. 2012 मध्ये झालेल्या लंडन ऑलिम्पिकमध्ये त्यांने कांस्य पदक पटकावले होते, तर रिओ ऑलिम्पिकमध्ये त्याला पदकापासून वंचित राहावे लागले होते.
- योगेश्वरचे गुरू मास्टर सतबीर यांनी हे नाते जुळवल्याचे बोलले जात आहे.
- शीतल ही जयभगवान शर्मा यांची एकुलती एक कन्या आहे. 1991 मध्ये माजी मुख्यमंत्री भजनलाल यांच्या प्रेरणेतून शर्मा यांनी राजकारणात पदार्पण केले होते.
बातम्या आणखी आहेत...